Vastu Tips : घरात ठेवा ‘ही’ एक वस्तू, कायम राहील पॉझिटिव्ह एनर्जी, जाणून घ्या

पोलिसनामा ऑनलाइन – वास्तुशास्त्रानुसार घरात धातुचे कासव (लोह, तांबे, सोने किंवा चांदी) ठेवणे खुप शुभ आहे. कासवाला भगवान विष्णुचे रूप मानले जाते. भगवान विष्णुने कासवाचे रूप धारण करून समुद्र मंथनाच्या वेळी मंद्रांचल पर्वत आपल्या कवचावर घेतला होता, असे म्हटले जाते. जेथे कासव असते, तेथे लक्ष्मी मातेचे आगमन होते. कासव ठेवल्याने घर आणि ऑफिसमध्ये सकारात्मक ऊर्जा कायम राहते.

धातूचे कासव ठेवताना त्याची दिशा कोणती हे महत्वाचे आहे, चुकीच्या दिशेला हे ठेवल्यास अशुभ परिणाम मिळू शकतात. घरात कासव ठेवण्याचे लाभ आणि त्याची दिशा जाणून घेवूयात.

हे आहेत लाभ
1 कासव ठेवल्याने धनप्राप्ती होते.
2 पैशासंबंधी अडचणी असल्यास कासव ठेवल्याने लाभ होतो. याठी क्रिस्टलचा कासव ठेवा.
3 घरात कासव ठेवल्याने कुटुंबातील सदस्यांना दिर्घआयुष्य लाभते.
4 अनेक आजार दूर राहतात.
5 हे जवळ ठेवल्याने नोकरी आणि परीक्षेत यश प्राप्त होते.
6 कुटुंबाला नजर लागण्यापासून वाचवते.
7 कुटुंबात सुख-शांती कायम राहाते.

नवा व्यापार सुरू करताना दुकान किंवा ऑफिसमध्ये चांदीचा कासव ठेवणे शुभ मानले जाते. जीवनात उर्जेचा प्रवाह समान होऊन स्थिरता प्राप्त होते आणि चढ-उतार कमी होतात.

फेंगशुईत वस्तू योग्य दिशेला ठेवण्याचे खास निर्देश आहेत, तेव्हाच पूर्ण लाभ मिळतात. उदाहरणार्थ, जर तुम्ही फेंगशुई कासव चुकीच्या पद्धतीने ठेवले तर याच्या फायद्याऐवजी नुकसान होईल.

फेंगशुईमध्ये कासवाला संरक्षक मानले जाते, कारण ते चार दिव्य जीवांपैकी एक मानले जाते. काळ्या रंगाचे कासव उत्तर दिशा, ग्रीन ड्रॅगन पूर्व दिशा, रेड फिनिक्सला दक्षिण दिशा, सफेद चित्त्याला पश्चिम दिशा मिळाली आहे. फेंगशुईनुसार हे चार कोणत्याही व्यक्तीच्या जीवनातील उर्जेला नियंत्रित करतात.

कार्यालय किंवा घराच्या मागच्या भागात (बॅकयार्ड) कासव ठेवल्याने मोठी उर्जा जाणवते. सर्व कामे व्यवस्थित पार पडतात. करियरमध्ये प्रगतीसाठी काळ्या रंगाचे कासव उत्तर दिशेला ठेवा. ऊर्जा वाढल्याने बिझनेस आणि करियरमध्ये प्रगती होण्याची शक्यता वाढते.

काळ्यारंगासह अनेक प्रकारचे कासव बनवले जाते. या सर्वांचा वेगवेगळा प्रभाव पडतो. वेगवेगळ्या तत्वांपासून तयार केलेले कासव उर्जा स्तर वेगवेगळया प्रकारे प्रभावित करतात. आपल्या गरजेनुसार कासवाची निवड करावी.

घराच्या मुख्य दरवाजावर पश्चिम दिशेला कासव ठेवल्याने सुरक्षा मिळते. प्रामुख्याने कासव घरात गुडलकसाठी ठेवले जाते. परंतु, एक खास प्रकारचे मादी कासव, जिच्या पाठीवर पिले सुद्धा असतात, ती प्रजननाचे प्रतिक असते. ज्या घरात संतती नसते त्या दांपत्याने हे कासव घरात ठेवावे.

क्रिस्टलने बनवलेले कास दक्षिण-पश्चिम किंवा उत्तर-पश्चिम दिशेला ठेवा. लाकडाचे कासव पूर्व किंवा दक्षिण-पूर्व दिशेला ठेवा. जर तुम्ही कासव लिव्हिंग रूमध्ये ठेवले तर कुटुंबात एकता वाढते.

मातीचे कासव उत्तर-पूर्व दिशा, मध्य किंवा दक्षिण-पश्चिम दिशेला ठेवले पाहिजे. धातुचे कासव उत्तर आणि उत्तर-पश्चिम दिशेला ठेवू शकता. मिश्र धातुचे कासव उत्तर दिशेला ठेवा. कासव ठेवण्यासंबंधी काही समस्या असेल तर कासव मुख्य दरवाज्याकडे ठेवा.

फेंगशुईनुसार कासवाचे मुख नेहमी घराच्या पूर्व दिशेला असावे, ही दिशा शुभ मानली गेली आहे. कासव नेहमी धातुच्या भांड्यात पाणी भरून त्यामध्ये ठेवले पाहिजे, ज्यामुळे घरात सुख, शांती आणि समृद्धीत येते.