वास्तुशास्त्र : घरात लावा ‘पिरामिड’, दूर होतील सर्व ‘अडचणी’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – आपण अनेक घरात किंवा ऑफिसमध्ये भिंतींना किंवा छताला पिरामिडच्या आकाराच्या वस्तू लावलेल्या पाहतो, ते खरंतर वास्तू दोष दूर करण्यासाठी लावण्यात येतात. वास्तू शास्त्रामध्ये पिरामिडचे महत्व अधिक आहे, पिरामिड तुम्हाला येणाऱ्या अनेक अडथळ्यापासून वाचवू शकतो. यामुळे घरातील अडचणी दूर होऊन घरात शांतता आणि चैतन्य राहते. त्यामुळे वास्तूशास्त्रात पिरामिडला अन्य साधारण महत्व आहे.

जर तुमच्या घरात कोणत्याही प्रकारच्या अडचणी सुरु असतील, कुटूंबामध्ये शांतता नांदत नसेल तर तुम्ही तुमच्या घरात पिरामिड ठेवून घर सुरक्षित आणि शांत ठेवू शकतात. असाच प्रकारे तुम्ही तुमच्या कार मध्ये, ऑफिसमध्ये पिरामिडचा वापर करु शकतात. कारमध्ये अशा प्रकारे पिरामिड लावल्यास दुर्घटनाचा प्रभाव कमी होतो. प्रवास सुरक्षित होण्यास मदत होते.

असे ही मानले जाते की पिरामिड उत्तर-दक्षिणेच्या कोपऱ्यात ठेवल्यास तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. परंतू जर पिरामिड योग्य दिशेला ठेवले नाही तर त्याच्या आसपास बसणाऱ्या व्यक्तीचे डोके दुखण्यास सुरुवात होते.

पिरामिडमधील पाणी पिल्यास पचन क्रिया सुधारते
पिरामिडमध्ये पाणी देखील ठेवण्यात येते, याच पिरामिडमधील पाणी पिल्यास तुमची पचन क्रिया सुधारु शकते. तसेच शरिरावरील बऱ्याच काळापासून असलेली जखमी बरी होते. तसेच पिरामिड समोर बसल्याने तुम्ही तणावापासून दूर राहतात.

दिवसभर थकणाऱ्या हातांनादेखील ‘रिलॅक्स’ करणे गरजेचे

गंभीर आजार होण्यापूर्वी शरीर देते संकेत, वेळीच डॉक्टरकडे जा

शुगर व कोलेस्टेरॉलमुळे होऊ शकतो ‘व्हॅस्क्युलर ट्यूमर’

सौंदर्य प्रसाधनेसुद्धा वाढवतात मधुमेहाचा धोका ! घ्यावी ही काळजी

‘वंचित’मुळे राहूल गांधींची कॉंग्रेस नेत्यांवर ‘आगपाखड’