‘पुरूष रात्री लुंगीमध्ये देखील कोणाला भेटू शकतात, मात्र महिला…’, वसुंधरा राजेंचं ‘ट्विट’ झालं व्हायरल

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – महिलांना आणि पुरुषांना कामात कशा अडचणी येतात हे राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजेंना एका कार्यक्रमात सांगितले. त्यांच्या या भाषणातील काही भाग ट्विटरवर पोस्ट करण्यात आला आहे. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच चर्चेत आला. विरोधक आपल्याबाबात अफवा पसरवत असल्याचे सांगत होणाऱ्या आरोपांवर उत्तर देताना त्यांनी हे वक्तव्य केले.

अखिल भारतीय क्षत्रिय महासभेचा कार्यक्रम जयपूरमध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी या कार्यक्रमात बोलताना त्या म्हणाल्या की पुरुष मंत्री, नेते यांच्याप्रमाणे महिला मंत्री आणि नेत्या कार्यकर्त्यांना जास्त वेळ देऊ शकत नाही, भेटू शकत नाही. हे बोलताना त्यासंबंधित कारणं देखील त्यांनी स्पष्ट केले. त्या म्हणाल्या की महिलांना काही मर्यादा असतात.

'पुरुष लुंगी नेसून भेटू शकतात पण महिला...' वसुंधरा राजेंचं ट्विट व्हायरल

माझ्या विरोधकांनी माझ्याबाबत अफवा पसरवी आहे की मी रात्री 10 नंतर भेट घेत नाही. त्यांना हे समजायला हवे की पुरुष आणि महिला नेत्यांच्या कामात फरक असतो. पुरुष रात्री लुंगी नेसून कोणालाही भेटू शकतात परंतू महिला रात्री लोकांना भेटू शकत नाहीत. कारण त्यांना काही मर्यादा पाळाव्या लागतात असे ट्विवट वसुंधरा राजे यांनी केले.

माझे विरोधक फक्त नकारात्मक गोष्टी पसरवतात. परंतू मी त्यामुळे मागे हटणार नाही आणि लोकांची सेवा देखील करत राहिलं. तुम्ही देखील अशा गोष्टींची काळजी करु नका. सेवा करायची असेल तर अशा आव्हानांचा सामना करावा लागेल असेही त्या म्हणाल्या. या कार्यक्रमात देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

Visit : Policenama.com