पुणे : जड वाहनांसाठी साधू वासनानी पूल बंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरेगाव पार्क आणि सर्किट हाउस भागाला जोडणारा साधू वासवानी पूल धोकादायक स्थितीत आहे, त्यामुळे खबरदारी बाळगावी म्हणून या पुलावरून जड वाहतुकीला बंदी केलीआहे. साधू वासवानी पूल सेंट मीराज कॉलेजपासून सर्किट हाउसकडे येताना आहे. हा पूल तेव्हाची गरज पाहून बांधला होता.

व या काळात वाहनांची संख्या वाढली आहे. या पुलावरून हि आता जाणाऱ्या – येणाऱ्याची मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढली आहे. त्यामुळे या पुलावर कोंडी वाढत आहे. मुंबई रस्त्याला सोलापूर रस्त्याने येऊन वाहने मिळत होती मात्र काही महिन्यांपूर्वी या पुलाला बसणारे हादरे वाढल्या कारणाने पालिकेकडून ऑडिट करण्यात आले होते.

पुल धोकादायक असल्याचे समजल्याने तिथे दुर्घटना घडू नये म्हणून जड वाहतूक बंद करण्यात आली आहे. बंडगार्डन वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अशी माहिती दिली आहे. साधू वासवानी पूल सध्याच्या वाहतुकीला कमी पडत आहे. यामुळे पालिका नवीन पूल उभारणार कि पुलाची दुरुस्ती करणार अशी चर्चा सुरु झाली आहे.