Vatpurnima | दुर्दैवी ! वटपोर्णिमेदिवशीच पतीने पत्नीवर धारदार शस्त्राने केले सपासप वार, सोलापूर जिल्ह्यातील घटना

अक्कलकोट : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – ऐन वटपोर्णिमेच्या (Vatpurnima) दिवशीच दारुड्या पतीने पत्नीवर धारदार शस्त्राने वार (Husband attack on wife) केल्याची धक्कादायक घटना सोलापूर जिल्ह्यातून समोर आली आहे. तसेच आरोपीने आपल्या पोटच्या मुलीचा कानही कापला आहे. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या महिलेवर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असून तिची प्रकृती गंभीर आहे. आरोपीने हा हल्ला नेमक्या कोणत्या कारणासाठी केला? हे अद्याप समजू शकले नाही. vatpurnima husband attack on wife with sharpen weapon and also cut daughters ear in akkalkot taluka

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

पूनम संभाजी पाटोळे (रा. वागदरी, ता. अक्लकोट) असे जखमी महिलेचे नाव आहे. तर संभाजी विष्णू पाटोळे हल्ला करणाऱ्या पतीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हा काल आपल्या 3 लहान मुली आणि पत्नी पूनम यांना दुचाकीवर घेऊन वागदरीमार्गे अक्कोलकोटकडे येत होता. दरम्यान त्याने वाटेत दुचाकी थांबवली. येथील एका दर्ग्यामागे नेऊन त्याने पत्नीवर धारधार शस्त्राने वार केले. यात ती गंभीर जखमी झाली आहे. आरोपी एवढ्यावरचं थांबला नाही, तर त्याने आपल्या पोटच्या मुलीवरही हल्ला केला आहे. त्याने लहान मुलीचा कानही कापला आहे. याप्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा (FIR) दाखल झाला नाही.

Web Title :-  vatpurnima husband attack on wife with sharpen weapon and also cut daughters ear in akkalkot taluka

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पुण्यातील व्यापार्‍याने 130 कोटींची बनावट बिले, कंपन्या स्थापन करून बुडवला कोट्यवधीचा GST

Anil Deshmukh | माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या घरावर ED चा ‘छापा’; 100 कोटीच्या वसुली प्रकरणाचा सुरुय तपास

2800 रुपयांचे जेवण ऑर्डर केले आणि 12 लाख रु. टिप दिली, वेटरने सांगितली ‘त्या’ मिस्ट्री मॅनची पूर्ण कथा

आदर्श ! जमशेदजी टाटा 100 वर्षात जगातील सर्वात मोठे ‘दानशूर’