Vatsala Andekar Passes Away | पुण्याच्या माजी महापौर वत्सला आंदेकर यांचे 69 व्या वर्षी निधन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Vatsala Andekar Passes Away | काँग्रेसच्या जेष्ठ कार्यकर्त्या आणि माजी महापौर वत्सला आंदेकर (Former Mayor Vatsala Andekar) यांचे आज (रविवार) दीर्घ आजाराने राहत्या घरी निधन झाले. त्या 69 वर्षाच्या होत्या. गेल्या वर्षभरापासून त्यात आजारी होत्या. राहत्या घरी आज सकाळी 9 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. (Vatsala Andekar Passes Away)

 

आंदेकर घराणे राजकारणात आले. त्यातूनच शहराच्या मध्यवर्ती भागातून आंदेकर यांच्या घरातील एक – दोन नगरसेवक प्रत्येक निवडणुकीत निवडून येत असतात.
सुरेश कलमाडी (Suresh Kalmadi) यांचे पुणे शहर काँग्रेस (Congress) व महापालिकेवर वर्चस्व होते. त्यावेळी 1998-99 मध्ये त्यांनी वत्सला आंदेकर यांची महापौरपदी निवड केली होती. (Vatsala Andekar Passes Away)

 

त्यानंतर 2012 च्या निवडणुकीत वत्सला आंदेकर यांना काँग्रेसने तिकीट नाकारले होते. तेव्हा त्यांनी अपक्ष म्हणून निवडणुक लढविली होती. परंतु, त्यात त्यांना यश मिळाले नाही. त्यानंतर त्यांचा राजकारणातील वावर कमी होत गेला. गेल्या 2 वर्षांपासून त्यांना मधुमेहाचा त्रास होता. गेल्या काही महिन्यांपासून त्या आजारी होत्या. त्यातच आज त्यांचे निधन झाले.

 

Web Title :- Vatsala Andekar Passes Away | Former Pune Mayor Vatsala Andekar dies at 69

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा