म्हणून राज्यात ‘मान्सून’ आणखी लांबणार !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – आधीच बळीराजा चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहत असताना या चिंतेत आणखी वाढ होण्याचो शक्यता आहे. या चिंतेचं कारण आहे भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर दक्षिण पूर्व भागात अधिकाधिक तीव्र होणारं ‘वायू’ चक्रीवादळ. या चक्रीवादळाचा महाराष्ट्राला धोका नसल्याचे हवामान खात्यातर्फे सांगण्यात आले. परंतु यामुळे मान्सून आणखी लांबणार आहे.

दरवर्षीप्रमाणे केरळमध्ये मान्सून १ जून रोजी हजेरी लावत असतो परंतु यावेळी मात्र तो ८ जूनला केरळमध्ये दाखल झाला आहे. म्हणजे अपेक्षेपेक्षा ७ दिवस उशिरा मान्सूनचे आगमन झालेले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही मान्सून तब्बल सात दिवस उशिरा म्हणजे १४ जूनपर्यंत दाखल होऊ शकेल.

‘वायू’ चक्रीवादळ भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर अरबी समुद्र, लक्षद्वीप, कर्नाटक आणि केरळच्या किनारपट्टीवर आणखीन तीव्र होणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. या वादळाचा मोठा धक्का गुजरातला बसण्याची शक्यता असून या वादळामुळे पाकिस्तानमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. मुंबईच्या किनारपट्टीकडे सरकणारे हे वादळ मुंबईपासून ६३० किमी अंतरावर आहे. गुजरात आणि कोकणात देखील पाऊस होण्याची शक्यता असून हा पाऊस मान्सूनमुळे होणार नसून ‘वायू’ चक्रीवादळामुळे होईल. मच्छिमारांना आज आणि उद्या मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

आरोग्यविषयक वृत्त (www.arogyanama.com)

रूग्ण वेळेत पोहचण्यासाठी रुग्णवाहिकेला आता ‘यल्लो कॉरिडोर’

वजन कमी करण्याची ‘ही’ थेरपी करून पाहा

 ठाण्यातील ६६ वर्षीय ब्रेनडेड महिलेचे अवयवदान

पाहिल्या पाऊसाचा आनंद घ्या मनसोक्त, बिनधास्त भिजा