आगामी २४ तासात ‘वायू’ चक्रीवादळ गुजरातला धडकणार

मुंबई : पोलीसनामा ऑलनलाइन – अरबी समुद्रात निर्माण झालेले ‘वायू’ चक्रीवादळ वेगाने गुजरातच्या दिशेने सरकत असून ते पुढील २४ तासात पोरबंदर आणि महुवा दरम्यान १३ जून रोजी सकाळी धडकण्याची शक्यता असून गुजरातमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

‘वायू’ चक्रीवादळचा वेग ताशी १३० ते १३५ किमी वेगाने फिरत आहे. सध्या हे चक्रीवादळ गोव्यापासून ४५० किमी तर मुंबईपासून २९० किमी आणि वेरावळपासून ३८० किमी दूर समुद्रात आहे. ते गुजरातच्या दिशेने ताशी १५ किमी वेगाने पुढे जात आहे. या पार्श्वभूमी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली. वीज सेवा, दूरसंचार सेवा आणि पिण्याच्या पाण्याचीvayu-cyclone सेवा सुरु ठेवण्याचे आदेश दिले. खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना दोन दिवस सुट्टी देण्यात आली आहे.

एनडीआरएफच्या २६ टीम तैनात करण्यात आल्या असून आणखी १० टीम लवकरच पाठविण्यात येणार आहे. याशिवाय भारतीय तटरक्षक दल, नौदल, सैन्य दल आणि हवाई दलालाही हायअलर्ट देण्यात आला आहे. कच्छपासून दक्षिण गुजरातपर्यंत अतिदक्षतेचा आदेश देण्यात आला आहे. ओडिशामध्ये नुकतेच ‘फणी’ चक्रीवादळ आले होते. या वादळाचा कसा मुकाबला केला, याची माहिती ओडिशा सरकारकडून घेण्यात येऊन त्यादृष्टीने उपाययोजना करण्यात येत आहेत. कमीतकमी मनुष्यहानी व्हावी, या हेतूने किनारपट्टीलगतच्या हजारो नागरिकांना हलविण्यास बुधवारपासून सुरुवात करण्यात आली आहे.
या चक्रीवादळचा परिणाम कच्छ, भावनगर, गीर, सोमनाथ, पोरबंदर, असरेली आणि जुनागड या भागाला बसणार आहे. या काळात येथे अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

‘वायू’ चक्रीवादळाचा कोकणात परिणाम

‘वायू’ चक्रीवादळाचा परिणाम कोकण किनारपट्टीसह मुंबईला जाणवू लागला आहे. किनारपट्टीवर वादळी वाऱ्यांचा जोर बुधवारी अचानक वाढल्याचे दिसून येत आहे. समुद्रांच्या लाटा उसळू लागल्या असून पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. वेळणेश्वर, गणपतीपुळे, मुरुड, हर्णे गुहागर या भागात काही ठिकाणी समुद्राच्या लाटांनी शिरकाव केला आहे.

रत्नागिरीत चीनची १० जहाजे

वादळसदृश्य परिस्थितीमुळे मच्छीमारांनी आपल्या होड्या सुरक्षित ठिकाणी हलविल्या आहेत. वादळी परिस्थिती लक्षात घेऊन मोठ्या जहाजांनी किनाऱ्यावर आश्रय घेतला आहे. रत्नागिरीत चीनच्या १० जहाजांना थांबण्याची परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय जयगड बंदर व परिसरात काही जहाजे थांबली आहेत. पुढील १२ तासात मुंबईसह उत्तर कोकणात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

आरोग्य विषयक वृत्त –

गरोदरपणातील समज-गैरसमज ? जाणून ‘घ्या’ सत्य

यामुळेही वाढू शकतो ‘टाइप-२ डायबिटीस’चा धोका

पोटाचा अल्सर असल्यास आढळतात ‘ही’ १० लक्षणे

‘या’ पाण्याचे आहेत अनेक फायदे ; अशक्तपणा दूर करण्यासह बरच काही

Loading...
You might also like