विधानसभा निवडणूकीसाठी वंचित सज्ज ; २८८ जागा लढणार, पहिली यादी ३० जुलैला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीत प्रबळ राजकीय पक्षांच्या मतांच्या समीकरणास ‘सुरुंग ‘ लावणाऱ्या आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सक्षम पर्याय ठरलेल्या वंचित बहुजन आघाडीने आता विधानसभा निवडणुकीसाठी २८८ जागांचे ‘टार्गेट ‘ठेवले आहे. वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनीच ही माहिती दिली आहे. शिवाय विधानसभेसाठी कुठल्याही पक्षाने अद्याप संपर्क साधलेला नसल्याचे स्पष्ट करून येत्या ३० जुलैला पहिली यादी जाहीर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. त्यावेळी आंबेडकर बोलत होते.

यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले कि, विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही तयारी सुरु केली आहे. २८८ जागा आम्ही लढणार आहोत आणि दोन अंकी जागा वंचितला निश्चित मिळतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीबाबत बोलताना ते म्हणाले कि, वंचित बहुजन आघाडीला भाजपने हरवले नाही तर ईव्हीएमने हरवले आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाकडे चौकशीची मागणी केली आहे. ज्या ठिकाणी मतांमध्ये फरक असेल. त्यासाठी न्यायालयात धाव घेतली जाणार आहे. काँग्रेसकडून वंचित बहुजन आघाडी भाजपची बी-टीम असल्याच्या आरोपाबाबत बोलताना आंबेडकर यांनी काँग्रेसने पुरावे द्यावे. अन्यथा ४० लाख मतदारांची त्यांनी माफी मागावी असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

आरोग्यविषयक वृत्त –

एक रामबाण उपाय जो तुम्हाला म्हातारपणीही देतो तारूण्याचा अनुभव 

अचानक येणारा हृदयविकाराचा झटका रोखता येऊ शकतो 

“केळी” आरोग्यासाठी उपयुक्त 

बाहेर जेवण करणे ठरू शकते मधुमेहाला निमंत्रण 

Loading...
You might also like