केंद्र सरकार शेतकरी ‘विरोधी’, ‘कंगाल’ अन् ‘दारुड्या’सारखं, प्रकाश आंबेडकरांची ‘जळजळीत’ टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशातील केंद्र सरकार कंगाल, दारुड्यासारखे सरकार असल्याची जळजळीत टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर केली. प्रकाश आंबडेकर म्हणाले की, या देशातील केंद्र सरकार हे कंगाल आणि दारुड्यासारखे सरकार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे देशातील आतंकवादी आहेत. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जिल्हा परिषेदच्या निकालावर त्यांनी भाष्य केले की आम्ही या निकालाने समाधानी आहोत. लोकांची कामं केली म्हणून आम्ही अकोल्यात सत्तेत आलो. काही जिल्हा परिषदेत आमचे सदस्य निवडून आले.

प्रकाश आंबेडकर म्हणाले की सरकार चालवण्यासाठी पैसे कुठून येणार, सरकारी तिजोरी खाली झाली आहे. आणि हे सरकार लपवत आहे. शासन चालवण्यासाठी 13 लाख कोटी सरासरी लागतील असा अंदाज आहे, नवा अर्थसंकल्प येईपर्यंत रक्कम जमेल की नाही अशी शंका आहे. प्रकाश आंबेडकर यांनी सवाल केला की सरकार चालवण्यासाठी पैसे कुठून येणार ? 12 लाख कोटींची तूट केंद्र सरकारवर पडणार आहे. दारुडा जसा घरातल्या वस्तू विकतो तसं सरकार मालमत्ता विकत आहे. सोन्याची अंड देणारी कोंबडी विकायचा डाव आहे.

अमेरिका आणि इराणमध्ये युद्ध झाले तर त्याचा मोठा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होणार आहे. नोटाबंदी दरम्यान एनआरआय लोकांना शासनाने पैसे डिपॉजिट करण्यात सूट दिली होती. याद्वारे किती पैसे आले याची माहिती सरकारने द्यावी. देशातील आर्थिक स्थिती लपवण्यासाठी सीएए, एनआरसी मुद्दे भाजपकडून पुढे करण्यात येत आहेत असा आरोप आंबेडकरांनी केला.

जेएनयू प्रकरणात भाजपची वृत्ती दिसून येते. हे त्यांच्याकडून घडवलं जात आहे. ते याला शहरी आंतकवादी असे म्हणतात. परंतु देशातील खरा आतंकवादी हा आरएसएस आहे असा आरोप देखील प्रकाश आंबेडकरांनी केला.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/