500 कोटी द्या ‘मुख्यमंत्री’ होऊन दाखवतो, प्रकाश आंबेडकरांचं ‘खळबळजनक’ वक्तव्य

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सीएए आणि एआरसीला विरोध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. याला महाराष्ट्रात संमिश्र प्रतिसाद मिळत आहे तर काही ठिकाणी याला हिंसक वळण लागले. एकिकडे महाराष्ट्र बंद पुकारला असताना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी हे वक्तव्य केले आहे.

मला तुम्ही 500 कोटी रुपये द्या, मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊन दाखवतो. ज्या दिवशी माझ्याकडे मतं विकत घेण्याची क्षमता येईल त्या दिवशी मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होईल, असे प्रकाश आंबेडकर यांनी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या या खळबजनक वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून त्यांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, विधानसभा निवडणुकीमध्ये वंचितला म्हणावा तितका प्रतिसाद मिळाला नाही. परंतु राज्याच्या राजकारणातील राजकीय समिकरणे बदलली. बदललेल्या राजकीय समिकरणामध्ये पुन्हा स्थान मिळवण्यासाठी तुम्ही सीएए आणी एनआरसीचा मुद्दा आणला आहे का ? यावर बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, ज्या लोकांचं मी प्रतिनिधित्व करतो आणि ज्यांनी मला 50 लाख मतं दिली त्यांचे रक्षणं करणं हे माझं काम आहे. निवडणूक जिंकणं किंवा न जिंकणं हा मुद्दा नाही. तुम्ही मला 500 कोटी द्या मी मुख्यमंत्री होऊन दाखतो. पण आम्ही प्रामाणीकपणे निवडणूक लढवली असल्याचे त्यांनी सांगितले.

फेसबुक पेज लाईक करा –