राजकीय गोंधळावर प्रकाश आंबेडकरांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले – ‘या’ पक्षाला मुख्यमंत्रिपद मिळण्याचा अंदाज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात विधानसभा पार तर पडल्या परंतू जनतेने कोणत्याही पक्षाच्या पदरात बहुमत दिले नाही. भाजप – शिवसेना युती सत्ता स्थापन करु शकते परंतू त्यांच्यातील मुख्यमंत्री पदावरील पेच अजून तसाच आहे. मुख्यमंत्री पदावर दोन्ही पक्ष दावा करत आहे. या सगळ्या गोंधळावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आपली भूमिका स्पष्ट करत म्हटले की, शिवसेना जेवढे ताणून धरेल तितका त्यांचा फायदा होईल. आता उद्धव ठाकरे किती ताणून धरतात त्यावरच सगळं काही अवलंबून आहे. शिवसेना अडून राहिल्यास त्यांना मुख्यमंत्रिपद मिळेल, असे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी म्हणले आहे.

राज्यात भाजप सेनेत सुरु असलेला सावळा गोंधळ हा मुख्यमंत्री पदासाठी नसून मंत्रिमंडळात चांगली खाती आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी आहे. शिवसेना देखील मंत्रिमंडळातील अत्यंत महत्वाच्या खात्यावर दावा करत आहे. परंतू भाजपकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचे कळत आहे. हा तिढा ताणला जात असताना आता भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी राज्यातील भाजप नेत्यांना संदेश जारी केला आहे.

अमित शाह मुंबई दौऱ्यावर येऊन सत्ता स्थापनेचा तिढा सोडवण्याचा प्रयत्न करणार होते मात्र शाहांचा दौरा रद्दा झाला आहे. राज्यातील भाजप नेत्यांकडून राज्य स्तरावरच हा तिढा सोडवावा असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस सत्तेची कोणती गणिते सोडवून शिवसेनेसमोर नवा प्रस्ताव ठेवतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Visit : Policenama.com