वंचित बहुजन आघाडी विधानसभेच्या सर्व जागा स्वतंत्र लढणार ; शरद पवारांना पाठिंबा नाहीच : प्रकाश आंबेडकर

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन – विधानसभा निवडणूकांबाबत प्रकाश आंबेडकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. लोकसभेप्रमाणेच वंचित बहुजन आघाडी विधानसभेच्या सर्व जागा स्वतंत्र लढविणार आहे. अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी आज स्पष्ट केली आहे. तर पंतप्रधानपदासाठी आपण राहूल गांधींपेक्षा मायावतींना पाठींबा देऊ परंतु शरद पवारांना पाठींबा देणार नाही. असा खुलासाही त्यांनी पंतप्रधान पदाबाबत केला आहे.

राज्यात अठरा पगड जातींना सोबत घेऊन सत्ताधारी भाजप व कॉंग्रेस या प्रस्थापित पक्षांविरोधात प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएमचे खासदार असदूद्दीन ओवेसी यांना साथीने वंचित बहुजन आघाडी स्थापन केली आहे. मागील ७० वर्षात कॉंग्रेसने भटक्या विमुक्तांना सत्तेपासून दूर ठेवले.

तर भाजपने एकाही मुस्लीम उमेदवारांना उमेदवारी दिली नाही. त्यामुळेच वंचित असलेल्या या समूहाची मोट बांधून त्यांना सत्तेपर्यंत पोहोचविण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून काम केले जात असल्याचे त्यांनी सागितले. होते. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणूकीत राज्यातील सर्वच्या सर्व ४८ जागा लढविल्या. त्यानंतर आता विधानसभेच्या सर्वच्या सर्व जागा स्वतंत्र लढविणार असल्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केले आहे.

त्यासोबतच पंतप्रधान पदासाठी कोणाला पाठींबा देणार याबाबत विचारल्यानंतर त्यांनी राहूल गांधींऐवजी मायावतींना पाठींबा देऊ. परंतु राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना मात्र पाठींबा देणार नाही. असेही त्य़ांनी सांगितले.