Ved Movie | रितेश-जिनिलीयाच्या ‘वेड’ चित्रपटाची 9 व्या दिवशी रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Ved Movie | सध्या रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख (Riteish And Genelia Deshmukh) यांच्या ‘वेड’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. वेड चित्रपटाने प्रेक्षकांना खरेच वेड लावले आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन आठवड्याच्या वर झाले असले तरीही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद चित्रपटाला मिळत आहे. सध्या चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहाबाहेर मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून रितेश देशमुख पहिल्यांदाच दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल टाकत आहे. तर अभिनेत्री जेनेलिया देशमुखचा हा पहिलाच मराठी चित्रपट आहे. (Ved Movie)

 

प्रेक्षकांनी या सेलिब्रिटी कपलला भरभरून प्रेम दिले आहे. आठवडाभरामध्येच या चित्रपटाने चांगलीच कमाई केली आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 2 कोटी 25 लाख रुपये कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी 3 कोटी 25 लाख रुपये अशी कमाई केली. तर रविवारी 4 कोटी 50 लाख तर सोमवारी 3 कोटी रुपये गल्ला या चित्रपटाने जमावला होता. तर या चित्रपटाच्या 9 व्या दिवशीची कमाई पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटले आहे. कारण ९व्या दिवशी या चित्रपटाची कमाई पहिल्या दिवसाच्या तब्बल दुप्पट कमाई होती. म्हणजेच या चित्रपटाने 9 व्या दिवशी तब्बल 5 कोटींचा गल्ला केला आहे. (Ved Movie)

 

वेड या चित्रपटाने रणवीर सिंगच्या ‘सर्कस’ या चित्रपटाला सुद्धा मागे टाकले आहे. वेड हा चित्रपट रिमेक असूनही प्रेक्षकांनी याला चांगलाच प्रतिसाद दर्शवला आहे. प्रेक्षकांचा प्रतिसाद या चित्रपटाला असाच राहिला तर हे आकडे येणाऱ्या काळात आणखीन वाढण्याची अपेक्षा केली जात आहे. आठवड्याभरातच या चित्रपटाने 20 कोटींची कमाई केली आहे. हि मराठी चित्रपटासाठी खूपच अभिमानास्पद गोष्ट आहे. आता येणाऱ्या काळात हा चित्रपट आणखीन किती कमाई करेल याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.

 

Web Title :- Ved Movie | riteish deshmukh and genelia deshmukhs ved movie 9 day box office record breaking collection

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

NCP Chief Sharad Pawar | राष्ट्रवादीवर जातीयवादाचा आरोप करणाऱ्या राज ठाकरेंना शरद पवारांचे प्रत्युत्तर, म्हणाले – ‘आम्ही…’

Chitra Wagh | महिला आयोगाच्या नोटीशीला चित्रा वाघ यांच्या उत्तर; ट्वीट करत म्हणाल्या…

Pune Crime News | प्रियकराच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची रेल्वेखाली उडी मारुन आत्महत्या; हडपसर पोलिसांनी प्रियकराला केली अटक