अष्टपैलू महिला क्रिकेटपटू वेदा कृष्णमूर्तीने कोरोनामुळे आई अन् बहिणीला गमावले

नवी दिल्ली : वृत्त संस्था – भारतीय अष्टपैलू महिला क्रिकेटपटू वेदा कृष्णमूर्तीच्या डोक्यावरील मातृछत्र कोरोनामुळे हरवले आहे. या दुर्दैवी घटनेला दोनच आठवडे उलटले असतानाच तिच्या बहिणीचाही कोरोनाने गुरुवारी (दि. 6) मृत्यू झाला आहे. पंधरा दिवसात आई आणि बहिणीचे निधन झाल्याने वेदाला मोठा धक्का बसला आहे.

वेदाने तिच्या बहिणीला कोरोना झाल्याचे सांगून तिच्यासाठी प्रार्थना करण्यास सांगितले होते. वेदाच्या आईचे पंधरा दिवसापूर्वीच निधन झाले आहे. त्यावेळी तिने अम्मा गेल्यावर काही लोकांनी पाठवलेल्या संदेशासाठी आभार. तिच्या जाण्याने आमच्या घरचा आधारच हरवला आहे. आम्ही आता आमच्या बहिणीसाठी प्रार्थना करत आहे. माझा कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आता मला थोडा एकांत हवा आहे. मी माझ्या प्रमाणेच कठिण परिस्थितीतून जात असलेल्या लोकांसाठी प्रार्थना करत असल्याची भावना वेदाने व्यक्त केली होती. पण दुर्दैवाने तिच्या बहिणीचाही आज कोरोनाने मृत्यू झाला आहे.