पुण्यातील प्रसिध्द बिल्डरवर कोट्यावधीची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – बांधकाम व्यवसायातील पत कमी करण्यासाठी करारानुसार ठरलेले फ्लॅट न देता बांधकाम व्यावसायिकाची आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी वेदांत बिल्डकॉमवर कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वेदांत बिल्डकॉमचे भागीदार राहुल गोयल व आकाश गोयल (रा. सिटी पाँईंट, ढोले पाटील रोड) अशी त्यांची नावे आहेत.

याप्रकरणी राजीव शिवनाथ सोनकर (वय ५३, रा. वॉटर फ्रंट, कल्याणीनगर) यांनी कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार पिसोळी येथे २०१५ पासून घडला आहे. एखादा गृहप्रकल्प, जागा विकसित करायची असेल व त्यासाठी भागभांडवल जास्त लागत असेल तर अनेकदा दोन बांधकाम व्यावसायिक एकत्र येऊन तो प्रकल्प पूर्ण करतात. त्यासाठी या दोन बांधकाम व्यावसायिकांमध्ये करार केला जातो. पिसोळी येथील जागेबाबतही असाच करार करण्यात आला होता. एका बांधकाम व्यावसायिकाने दुसऱ्या बांधकाम व्यावसायिकावर फौजदारी दावा दाखल करण्याची पुण्यातील काही वर्षातील हा पहिलाच प्रकार आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’15f645af-d0fb-11e8-b63b-6f5a9b1c1c22′]

याबाबत पोलिसांनी सांगितले की, राजीव सोनकर यांचा डायनेमिक रियल्टी व्हेन्चर्स या नावाने बांधकाम व्यवसाय आहे. त्यांनी पिसोळी येथील स. नं. ०४, स. नं. ०६, स. नं. ४/२ येथील एकूण १ हेक्टर ३७ आर इतकी जमीन विकसित करण्यासाठी वेदांत बिल्डकॉमचे भागीदार राहूल गोयल आणि आकाश गोयल यांच्याबरोबर करार केला. या करारानुसार सोनकर यांना १२३ फ्लॅट देण्यात येणार होते. मात्र, बाजारपेठेतील चढउतार व अन्य अनेक कारणामुळे हा प्रकल्प रेंगाळत गेला. २०१५ मध्ये सोनकर यांना हे फ्लॅट मिळणे अपेक्षित असताना मुदतीत वेदांत बिल्डकॉमने काम पूर्ण केले नाही. तसेच त्यांना १२३ फ्लॅटपैकी फक्त ७५ फ्लॅट दिले. उरलेले ४८ फ्लॅट दिले नाही.

[amazon_link asins=’B07GFQTQFF’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1e3b94cd-d0fb-11e8-9e40-77b03979ac48′]

करारानुसार आपल्याला मिळणाऱ्या फ्लॅटची बुकिंग सोनकर यांनी घेतले होते. मात्र, वेदांत बिल्डकॉमकडून ४८ फ्लॅट न मिळाल्याने सोनकरांकडे ज्या ग्राहकांनी फ्लॅट बुक केले होते. त्यांना सोनकर यांना फ्लॅटचा ताबा देता आला नाही. यामुळे बांधकाम व्यवसायातील सोनकर यांची व्यावसायिक पत कमी झाली. त्यांनी अनेकदा वेदांत बिल्डकॉमचे गोयल यांच्याकडे मागणी केली तरी त्यांनी उरलेले ४८ फ्लॅट न दिल्याने शेवटी त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली आहे. विकसन करारनाम्याप्रमाणे कोणतीही पुर्तता न करता त्यांच्या वाटयाचे ४८ फ्लॅट मुदतीत न देता केलेल्या करारच्या अटी व शर्तीचा भंग करून व्यावसायिक व आर्थिक फसवणूक केली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.

औषधांचा तुटवडा असल्याची गिरीश बापट यांची कबुली

याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी फसवणूकीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक पाडवी अधिक तपास करीत आहेत. बांधकाम व्यावसायिकाने ग्राहकाला करारानुसार वेळेत फ्लॅटचा ताबा दिला नाही, ठरल्याप्रमाणे आवश्यक सोयीसुविधा दिल्या नाहीत तर महारेरा कायद्यानुसार बांधकाम व्यावसायिकाला कठोर शिक्षा करण्यात येते. त्यामुळे वेदांत बिल्डकॉमकडून वेळेत फ्लॅट न मिळाल्याने सोनकर यांच्या डायनेमिक रियल्टी व्हेन्चर्स  यांनाही त्यांच्या ग्राहकांना वेळेवर फ्लॅट देता आले नसल्याने शेवटी त्यांनी हा गुन्हा दाखल केला असावा.

[amazon_link asins=’B01M32YSMI’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’bfb21d7f-d0fb-11e8-98af-031796cf2f18′]