Vedanta Foxconn Project | वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प (Vedanta Foxconn Project) महाराष्ट्रातून गुजरातला गेला; विरोधक आक्रमक, मुख्यमंत्र्यांचा PM मोदींना फोन?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प (Vedanta Foxconn Project) महाराष्ट्रातून गुजरातला गेला आणि त्यावरुन राजकीय वातावरण तापलं. राज्यात आरोप-प्रत्यारोपांचं राजकीय रणकंद सुरु झालं आहे. तब्बल एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक (Investment) आणि लाखभर नोकऱ्या (Job) उपलब्ध होऊ शकणारा वेदांता-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्प (Vedanta Foxconn Project) अखेरच्या क्षणी गुजरातला (Gujarat) गेला. यावर विरोधक आक्रमक झाले असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी याचं खापर महाविकास आघाडी सरकारवर (Maha Vikas Aghadi Government) फोडलं आहे. गेली दोन वर्षे कंपनीला जो प्रतिसाद मिळायला हवा होता, तो कमी पडला असावा, असे सांगत शिंदे यांनी आधीच्या सरकारकडे बोट दाखवलं आहे.

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पाच्या (Vedanta Foxconn Project) मुद्यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आम्हाला तर दोन महिने झाले आहेत. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर वेदांता कंपनीच्या प्रमुखांशी माझी चर्चा झाली होती. सरकार त्यांना प्रकल्पासाठी जी काही मदत हवी ती देईल, असं बोलणं झालं होतं. त्यानंतर तळेगावमध्ये (Talegaon) जवळपास 1100 एकर जमीनदेखील आम्ही देऊ केली होती. पण गेल्या दोन वर्षांत वेदांता कंपनीला ज्या प्रकारे रिस्पॉन्स मिळायला हवा होता, तो कमी पडला असावा. आता याबाबत केंद्र सरकार (Central Government) आणि अग्रवाल हे कंपनीच्या मालकांसोबत बातचीत करणार आहेत. तो प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात आणण्याचा प्रयत्न करु, असे मुख्यमंत्री एकनाथ थिंदे यांनी सांगितले.

पंतप्रधानांसोबत फोनवर चर्चा?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यात काल फोनवरुन चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.
वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्र ऐवजी गुजरातला गेल्यानं शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde-Fadnavis Government) महाविकास आघाडीने जोरदार हल्लाबोल केला आहे.
त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्यातील चर्चा महत्त्वाची मानली जात आहे.
वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गेल्यामुळे महाराष्ट्रानं एक लाख कोटीहून अधिक गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीची मोठी संधी गमावली आहे.
आता पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांना काय आश्वासन दिलं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Web Title :- Vedanta Foxconn Project |cm eknath shinde first reaction on vedanta foxconn project shiv sena bjp aaditya thackeray maha vikas aghadi

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Water Supply | पुणे शहराला वर्षभर पुरणाऱ्या पाण्याचा मुठा नदीत विसर्ग

Pune Crime | हडपसरमध्ये 2 मैत्रिणींची आत्महत्या; एकीने घेतला गळफास तर दुसरीने इमारतीवरुन मारली उडली