Vedanta Foxconn Project | ‘महाराष्ट्राला सीरियस मुख्यमंत्र्याची गरज, वेळ पडली तर दोन मुख्यमंत्री नेमा’, सुप्रिया सुळेंची उपहासात्मक टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प (Vedanta Foxconn Project) महाराष्ट्रातून गुजरात मध्ये गेल्यामुळे विरोधक आक्रमक झाले आहेत. प्रकल्प गुजरातला (Gujarat) गेल्याने महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापल असून आरोपप्रत्यारोप सुरु झाले आहेत. यातच आता राष्ट्रवादीच्या खासदार (NCP MP) सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प (Vedanta Foxconn Project) गुजरातला गेल्याने केंद्र सरकारवर (Central Government) टीका केली आहे. फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला नेऊन महाराष्ट्राचं (Maharashtra) आणि मुंबईचं (Mumbai) महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न सुरु असल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे. तसेच महाराष्ट्राला सीरियस मुख्यमंत्र्यांची गरज आहे. वेळ पडली तर दोन मुख्यमंत्री नेमा, असा उपहासात्मक टोला त्यांनी लगावला.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, माझी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, त्यांनी सगळ्या मंडळांमध्ये जावं, सगळं साजरं करावं. म्हणून मी सातत्याने म्हणते की राज्याला सीरियस मुख्यमंत्र्याची (Sirius Chief Minister) गरज आहे. वेळ पडली तर या सरकारने दोन मुख्यमंत्री नेमावे, एकाने यात्रेवर जावं आणि एकाने राज्य चालवावं. म्हणजे आता जे महाराष्ट्राचं नुकसान झालं आहे ते होणार नाही. कारण हे महाराष्ट्राला परवडणारं नाही. वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पामुळे (Vedanta Foxconn Project) लाखो नोकऱ्या मिळणार होत्या, असं काय घडलं की आपल्या हातातील घास काढून घेतला? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला नेऊन महाराष्ट्र, मुंबईचं महत्त्व कमी करण्याचं काम सुरु आहे.
केंद्र सरकार महाराष्ट्राच्या विरोधात हा कटर असल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला.
तसेच छत्रपतींचं नाव घेऊन हे सरकार सत्तेत आलं. पण छत्रपती कधी दिल्लीसमोर झुकले नाहीत.
हे सरकार सातत्याने दिल्ली म्हणेल तेच करतं. दुर्दैवाची गोष्ट ही आहे जी शिवसेना (Shivsena),
ज्याकडे भाजप (BJP) यायचा, आता शिंदे गटाचे सगळे निर्णय दिल्लीतून होतात.
काहीतरी नवी कल्चर महाराष्ट्रात येतंय हे दुर्वैवी असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले.

Web Title :- Vedanta Foxconn Project | maharashtra needs a serious focused chief minister appoint two chief ministers if time permits says ncp mp supriya sule

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Vitamin B12 | ‘या’ 5 संकेतांवरून जाणून घ्या शरीरात झाली आहे व्हिटॅमिन B-12 ची मोठी कमतरता, काम करणे बंद करतील अनेक अवयव

Vedanta Foxconn Project | वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प (Vedanta Foxconn Project) महाराष्ट्रातून गुजरातला गेला; विरोधक आक्रमक, मुख्यमंत्र्यांचा PM मोदींना फोन?

Pune Police Inspector Transfer | पुण्यातील 9 पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या ! भारती विद्यापीठ, खडक, समर्थ आणि सिंहगड रोड पो.स्टे. मध्ये नियुक्त्या

NEMS School Pune | आजी आजोबांनी निभावली परीक्षकांची भूमिका; एनईएमएस शाळेचा अनोखा उपक्रम