‘वीर सावरकरांपेक्षा अधिक कोणी धर्मनिरपेक्ष नाही, इंदिरा गांधी देखील होत्या अनुयायी’ : सावरकरांचे नातू रंजित

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबतचे आरोप प्रत्यारोप थांबायच नाव घेत नाहीय. नुकतंच सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांनी याबाबत एक वक्तव्य केलं आहे. रणजीत यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधींचं कौतुक केलं आहे.

रणजीत म्हणाले, इंदिरा गांधींनी वीर सावरकरांचा सन्मान केला आहे आणि मला असे वाटते की त्या सावरकरांच्या अनुयायी होत्या कारण त्यांनी पाकिस्तानला आपल्यासमोर गुडघे टेकवायला लावले होते आणि परदेशी संबंधांना अधिक बळकट केले होते. तसेच त्यांनी अणुअस्त्राची चाचणी देखील केली. हे सर्व नेहरू आणि गांधींच्या विचारांच्या विपरीत आहे.

ओवेसी यांच्याबाबत देखील रणजीत यांनी आपले म्हणणे मांडले आहे, ते म्हणाले की धर्माबाबत तुम्ही वीर सावरकरांच्या विचारांवर विश्वास ठेवला पाहिजे, धर्म हा तुम्ही आपल्या घरात ठेवा त्यामुळे तुम्ही हिंदू किंवा मुसलमान नसून भारतीय आहात. सावकारांनी सगळ्यांकडून ही अपेक्षा केली होती की जो कोणी संसदेत जाईल त्याने धर्म, लिंग, जात आदींपासून दूर राहिले पाहिजे. त्यामुळे तुम्ही सावरकरांइतका धर्मनिरपेक्ष व्यक्ती शोधूच शकत नाही.

Visit : Policenama.com 

शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी
बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या