आता काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्यानं केली वीर सावरकरांची ‘प्रशंसा’, म्हणाले – ‘स्वातंत्र्य मिळवण्यासाठी गेले होते तुरूंगात’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भाजपाने जाहीरनाम्यात वीर सावरकरांना भारतरत्न देण्याची शिफारशीचा समावेश आहे. त्यावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये वाद सुरु झाला आहे. त्यांनतर आता कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी सोमवारी सावरकरांचे कौतुक करताना म्हंटले आहे की सावरकरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी भूमिका बजावली तसेच देशासाठी तुरूंगात गेले. याविषयी त्यांनी ट्विट केले आहे.

सिंघवी यांनी ट्वीटमध्ये म्हंटले आहे की, ‘मी व्यक्तिशः सावरकरांच्या विचारसरणीशी सहमत नाही पण स्वातंत्र्यलढ्यात त्यांचे योगदान नाकारले जाऊ शकत नाही. ते एक निपुण व्यक्ती होते. देशाच्या स्वातंत्र्यासाठी भूमिका बजावली. दलित हक्कांसाठी लढा दिला आणि देशासाठी तुरूंगात गेले. हे कधीही विसरू नका.’

नरेंद्र मोदींचे कौतुक –
महात्मा गांधींचे संदेश पोहोचवण्यासाठी हिंदी चित्रपटसृष्टीतील व्यक्तिमत्त्वांची मदत घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे त्यांनी कौतुक केले. सिंघवी म्हणाले, ‘कोणाचे काम प्रशंसेयोग्य असेल तेथे त्याचे कौतुक केले पाहिजे. गांधीजींच्या स्वच्छतेशी निगडित संदेश देण्यासाठी नरेंद्र मोदी बॉलिवूडमधील सॉफ्ट पॉवर वापरत आहेत.’

आम्ही सावरकरांच्या विरोधात नाही – माजी पंतप्रधान मनमोहन सिंग
सावरकरांच्या संदर्भात सिंघवी यांच्या टिप्पणीपूर्वी काही दिवसांपूर्वी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मुंबईत म्हटले होते की पंतप्रधान म्हणून इंदिरा गांधींनी सावरकरांच्या स्मृतीत टपाल तिकिट जारी केले होते. आम्ही सावरकरांच्या विरोधात नाही, तर ज्या विचारसरणीचे होते, त्या विरोधात आहेत.

विशेष म्हणजे महाराष्ट्र भाजपाने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी केली आहे. तेव्हापासून या विषयावर बरीच राजकीय चर्चा सुरू आहे. भाजप जाहीरनामा आल्यानंतर कॉंग्रेसचे प्रवक्ते मनीष तिवारी यांनी आपल्या पहिल्या प्रतिक्रियेत म्हटले होते की, सावरकरांना भारतरत्न देण्याचा विचार असेल तर देशाला केवळ देवच वाचवू शकतो.

Visit : policenama.com