चंदन ‘तस्कर’ वीरप्पनच्या मुलगी विद्या राणीची भाजपात ‘एन्ट्री’, म्हणाल्या – ‘गरिबांसाठी नक्की काम करणार’

कृष्णागिरी/तामीळनाडू : वृत्तसंस्था – कुख्यात चंदन तस्कर वीरप्पन याची मुलगी विद्या राणी हीने शनिवारी एका कार्यक्रमात भाजपमध्ये प्रवेश केला. पक्षाचे सरचिटणीस मुरलीधर राव आणि माजी केंद्रीय मंत्री राधाकृष्ण यांच्या उपस्थित विद्या राणी हीने भाजपत प्रवेश केला. यावेळी बोलताना विद्या राणी म्हणाली, मला माझी जात आणि धर्म विचारात न घेता गरीब आणि वंचित लोकांसाठी काम करणायचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजना लोकांसाठी असून त्या मला त्यांच्यापर्यंत पोहचवायच्या आहेत. यावेळी विद्या राणी यांच्या व्यतिरिक्त 1 हजाराहून अधिक जणांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

विरपन्नच्या मृत्यूनंतर त्याची पत्नी मुत्तुलक्ष्मीने समाजसेवत सक्रीय झाली आहे. तिने 2006 मध्ये तामिळनाडूमध्ये विधानसभेची निवडणूक लढवली होती. मात्र, या निवडणुकीत तिचा पराभव झाला होता. त्यानंतर 2018 मध्ये तिने ग्रामस्थांना एकत्रीत करून एका संघटनेची स्थापना केली होती. विरप्पन आणि मुत्तुलक्ष्मी यांना दोन मुली असून विद्या राणी ही त्यांची मोठी मुलगी आहे.

कोण होता विरप्पन ?
विरप्पन बाबात अनेक गोष्टी बोलल्या जातात. हत्तींच्या दातांची तस्करी करण्यासाठी विरप्पनने तब्बल दोन हजार हत्तींची हत्या केली होती. चंदनाची हजारो झाडे त्याने तोडून त्याची तस्करी केली होती. त्याची दहशत एवढी होती की जंगलात जाण्याचे कोणाचेच धाडस होत नव्हते. त्याने त्याच्या कारकर्दीत किती लोकांचा जीव घेतला याची आकडेवारी कोणालाच माहीत नाही. विरप्पन हा त्याच्याकडे आसलेले पैसे एका रबली बुटात ठेवून ते बूट जमीनीत पूरून ठेवत होता.

विरप्पनने 1962 मध्ये म्हणजेच वयाच्या दहाव्या वर्षी एका तस्कराचा खून केला. त्याच्या आयुष्यातील हा पहिला गुन्हा होता. त्यानंतर त्याने वनविभागाच्या तिन अधिकाऱ्यांचा खून केला. विरप्पनचे खरे नाव वीरैय्या होते. त्यानंतर तो वीरप्पन नावाने ओळखला जाऊ लागला. गावातील लोकांनी वन अधिकाऱ्यांवर आरोप करताना म्हटले की, वन अधिकाऱ्यांनी त्याला तस्करी करण्यासाठी प्रोत्साहीत केले होते.