Vegan Diet | FSSAI ने ‘वेगन’ फूडसाठी बनवले विशेष रेग्युलेशन, लोकांना ताबडतोब ओळखता येणार
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Vegan Diet | जर तुम्हाला वेगन डाएट (Vegan Diet) आवडत असेल तर बाजारातून आपल्या आवडीचे फूड आयटम खरेदी करणे सोपे होणार आहे. व्हेजीटेरियन आणि नॉन-व्हेजिटेरियन फूडप्रमाणे आता वेगन फूड केवळ एका लोगोवरून ओळखू शकता. फूड सेफ्टी रेग्युलेटर भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) वेगन फूडसाठी विशेष रेग्युलेशन आणि लोगो बनवला आहे. वेगन फूड बनवण्याचा दावा करणार्या कंपन्यांना या नियमांचे पालन करणे अनिवार्य होणार आहे.
असे आहेत वेगनसाठी नवीन नियम (the new rules for Vegan)
1. कुणीही व्यक्ती वेगन फूडच्या नावावर कोणत्याही खाद्याची निर्मिती, पॅकिंग, विक्री, वितरण किंवा आयात किंवा निर्यात करू शकणार नाही, जोपर्यंत या नियमांतर्गत ठरलेल्या नियमांचे पालन केले जात नाही.
2. वेगन सांगितल्या जाणार्या खाद्य उत्पादनात किंवा भागात पशुंकडून आलेला कोणताही घटक नसेल तसेच ते तयार करताना पशुसंबंधी कोणताही GMO चा घटक नसेल.
3. वेगन सांगितल्या जाणार्या खाद्य पदार्थांची ट्रेसिबिलिटी निर्माता स्तरापर्यंत तयार केली जाईल आणि गरज पडल्यास त्याची वेळोवेळी तपासणी केली जाईल.
4. जर कुणी कंपनी किंवा फूड बिझनेस वेगन फूड बनवणार असेल तर त्यास फूड सेफ्टी रेग्युलेटरला सर्व आवश्यक माहितीसह अर्ज द्यावा लागेल.
5. तसेच वेगन खाद्य निमिर्ती प्लांट, मशीनरी, परिसराची माहिती द्यावी लागेल.
गरज भासल्यास संबंधित अन्न सुरक्षा अधिकारी दाव्याची पडताळणी करू शकतो.
6. वेगन फूडचे लायसन्स देण्यापूर्वी फायनल प्रॉडक्टची तपासणी मॉलीक्यूलर आणि रासायनिक किंवा दोन्ही पद्धतीने केली जाईल जेणेकरून हे शोधता येईल की या पदार्थांमध्ये पशुमधून आलेले एखादे तत्व तर नाही ना.
7. फूड अथॉरिटी वेगन लोगोच्या लायसन्ससाठी वेळोवेळी गाईडलाईन आणू शकते.
8. बाजारात वेळोवेळी सर्वेक्षण होऊ शकते.
9. वर्षात किमान एकदा अशा संस्थांची तपासणी सुद्धा केली जाऊ शकते.
कसा असेल वेगन लोगो
(What would the Vegan logo look like?)
वेगन लोगो हिरव्या रंगाचा असेल आणि त्यामध्ये V चा मार्क आणि वनस्पतीचे निशाण असेल. हिरवा रंग पदार्थाची प्लांट ओरिजिन दर्शवतो. तर व्ही मार्क ते वेगन असल्याचे सांगतो.
खाद्य निर्मात्यांना हा मार्क फूड पॅकेटवर अशाप्रकारे लावावा लागेल की ग्राहक ते व्हेज आणि नॉन व्हेजच्या लोगोपासून वेगळा करून पाहू शकतात.
काय आहे वेगन फूड?
(What is vegan food?)
वेगन फूड ते खाद्य पदार्थ आहेत ज्यामध्ये पशु किंवा त्याच्याद्वारे तयार केलेल्या कोणत्याही उत्पादनाचा समावेश केला जात नाही.
वेगन फूडमध्ये डेयरी प्रोडक्ट, दूध, मध, पनीर, लोणी, अंडे आणि मांस सारख्या पदार्थांचे घटकही नसतात.
हे फूड पूर्णपणे वनस्पतीपासून तयार केलेले असते.
सध्या वेगन फूडची मागणी जोरात आहे आणि एक्सपर्ट राहण्यासाठी वेगन फूडचा सल्ला सुद्धा देतात.
Web Title : Vegan Diet | fssai india formulates safety code for vegan food
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
MP Vinayak Raut | विनायक राऊतांचा राणे पुत्रांना टोला; म्हणाले – ‘टिंगू-मिंगू बडेजाव मारायला लागले’