‘शाकाहार’ सेवन करणार्‍यांनी ‘प्रोटीन’साठी आवश्य खावेत ‘हे’ 10 पदार्थ, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – शरीर निरोगी ठेवण्यासाठी प्रोटीनयुक्त आहार गरजेचा आहे. मांसाहारी लोकांना चिकन आणि अंड्यातून भरपूर प्रोटीन्स मिळतात. मात्र, शाकाहारींसाठी प्रोटीन्सचे स्त्रोत खुपच कमी आहेत. भरपूर प्रोटीनयुक्त असे 10 पदार्थ आपण जाणून घेणार आहोत, ज्यामुळे आरोग्य चांगले राहिल आणि चवसुद्धा घेता येईल.

1 टोफू
टोफू प्रोटीनचा चांगला स्रोत आहे. यामध्ये शरीरसाठी आवश्यक सर्व अ‍ॅसिड आढळतात. हे पनीर सारखे दिसते. टोफूमध्ये नैसर्गिक स्वाद असतो आणि ते खुप मऊ असते. टोफूपासून डेझर्ट आणि शेकसुद्धा तयार केले जाते. तुम्ही ते फ्राय करूनही खाऊ शकता.

2 डाळ
डाळीत खुप प्रोटीन्स असतात. एक कप डाळीत तुम्हाला सुमारे 18 ग्रॅम प्रोटीन मिळू शकतात. डाळ तुम्ही सूप प्रमाणेही बनवू शकता.

3 सुकामेवा, पनीर, बटर
बादाम, पिस्ता, आणि काजूमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते. 2 चमचे ऑर्गेनिक पीनट बटरमध्ये 8 ग्रॅम प्रोटीन असते. पीनट बटरपासून तुम्ही चविष्ठ ब्रेकफास्ट, स्नॅक्स आणि स्मूदीसुद्धा तयार करू शकता.

4 पालक
पालक तुम्ही कच्चासुद्धा खाऊ शकता. तुम्ही हे स्मूदी किंवा सलाडमध्ये सुद्धा खाऊ शकता. अर्धा कप पालकमध्ये 3 ग्रॅम प्रोटीन आढळते. जेवणात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा.

5 सोया मिल्क
शाकाहारींसाठी सोया दूध प्रोटीनचा चांगला पर्याय आहे. हे तुम्ही अनेक पद्धतीने सेवन करू शकता. कॉफी, स्मूदी, बेकिंग किंवा अन्य पदार्थामध्ये याचा वापर करू शकता.

6 बीन्स
बीन्समध्ये फायबर आणि प्रोटीनची चांगली मात्रा असते. एक कप बीन्समध्ये 25.8 ग्रॅम प्रोटीन आढळते. तुम्ही भाजीसह याचा वापर सलाडमध्ये करू शकता.

7 ओट्स
प्रोटीनसह ओट्स वजनकमी करण्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे. केवळ अर्धा कप ओट्समधून 6.75 ग्रॅम प्रोटीन मिळतात. हे तयार करणेसुद्धा खुप सोपे असते.

8 भोपळ्याचे बी
भोपळ्याच्या बीमध्ये भरपूर प्रोटीन असते. हे मसाल्यासोबत भाजून खाऊ शकता.

9 घेवडा
घेवड्याच्या शेंगा आरोग्यासाठी खुप लाभदायक आहेत. एक कप घेवड्याच्या शेंगामध्ये 18.46 ग्रॅम प्रोटीन आढळते. याची भाजी किंवा सूप करून सेवन करू शकता.

10 ब्रोकली
बोक्रली वजन कमी करण्यासाठी खुप उपयोगी आहे. ही चवदार असते, शिवाय यामध्ये प्रोटीनची मात्रा भरपूर असते. ब्रोकलीशिवाय फ्लॉवरमध्येही भरपूर प्रोटीन्स असतात.

You might also like