‘या’ लोकांकडून ‘कोरोना’चा सर्वाधिक धोका, केंद्रानं दिली राज्यांना ‘ही’ सूचना, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – किराणा दुकानांवर काम करणारे आणि रस्त्यांवरील विक्रेत्यांपासून कोरोना पसरण्याचा धोका सर्वाधिक असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. अशा लोकांमुळे मोठ्या प्रमाणावर लोक संक्रमित होऊ शकतात, असे केंद्रीय आरोग्य विभागाने म्हटले आहे. तसेच राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना, अशा लोकांची वेगाने तपासणी करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. आरोग्य मंत्रालयाने म्हटल्या प्रमाणे यामुळे मृत्यू दर कमी होण्यासही मदत मिळू शकते. राज्ये आणि केंद्रसासित प्रदेशांना लिहिलेल्या पत्रात आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी हा सल्ला दिला आहे.

राज्यांनी वेगाने तपासणी करावी
आरोग्य मंत्रालयाने राज्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, बंद असलेल्या कामाच्या ठिकाणी इंडस्ट्रिअल क्लसर्स असू शकतात, जिथे अधिकांश कोरोनाबाधित असलेल्या ठिकाणावरून लोक येत आहेत. झोपडपट्ट्या, जेल, वृद्धाश्रमांत देखील हॉटस्पॉट असू शकतात. तसेच किराणा दुकानवाले, भाजी विक्रेते आणि इतरही काही विक्रेते संक्रमणास कारणीभूत ठरु शकतात, असे भाग आणि अशा लोकांची तपासणी आयसीएमआरच्या गाईडलाईन्स नुसार वेगाने होणे आवश्यक आहे.

नव्या भागांतील संक्रमण रोखणे आवश्यक
भूषण यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, ऑक्सिजनची व्यवस्था आणि क्विक रिस्पॉन्स मॅकेनिझमच्या रुग्णवाहिका ट्रान्स्पोर्ट सिस्टमचीही आवश्यकता आहे. अनेक राज्यांमध्ये रुग्णवाहिका मिळण्यास अडचणी येत आहे. आता नव्या भागामध्ये संक्रमित लोक आढळून येत आहेत. यावर भूषण यांनी सांगितले की, रुग्णाचे क्लस्टर्स अथवा मोठा उद्रेक होऊ शकतो. अशा प्रकारे उद्रेक थांबवणे गरजेचे आहे. खासकरून नव्या ठिकाणी.

आपला उद्देश मृत्यू दर कमी करणे असायला हवा
भूषण यांनी हे पत्र, राज्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव, मुख्य सचिव आणि आरोग्य सचिवांना पाठवले आहे. या पत्रात त्यांनी आतापर्यंत आपण केलेले काम इतर देशांच्या तुलनेत चांगले आहे. आपला उद्देश मृत्यू दर कमी करणे असायला हवा. आपण हे नश्चित करायला पाहिजे, की हा दर 1 टक्क्याहून अधिक नसावा, असे पत्रात म्हटले आहे. तसेच तपासणीचा वेग वाढवून रुग्णांना आयसोलेट किंवा रुग्णालयात दाखल करणे आणि त्यांना चांगल्या प्रकारची आरोग्य सेवा देणे किंवा व्यवस्था करणे आवश्यक आहे.