Pune : भाजी विकताना जोरात ओरडला म्हणून भाजीविक्रेत्याच्या पोटात चाकू भोसकला; रविवार पेठेत 15 ते 20 जणांच्या जमावाकडून हल्ला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  रस्त्यावर भाजी विक्री (Vegetable sales) करताना जोरजोरात ओरडून मोठा आवाज केला म्हणून झालेल्या वादातून १५ ते २० जणांच्या टोळक्याने भाजीविक्रेत्यांवर (Vegetable sales) हल्ला केला. आरोपींनी भाजीविक्रेत्यांच्या (Vegetable sales) पोटात चाकूने पोटात भोसकल्याने ते गंभीर जखमी झाला आहे. फरासखाना पोलिसांनी या प्रकरणात पाच आरोपींना अटक केली.

HSC Bord Exam : बारावीची परीक्षा रद्द करण्याची अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता, राज्य मंत्रिमंडळाचं झालं एकमत

वाजीद बशीर शेख (वय 35, रा. 715, सरोज अपार्टमेंट, नाना पेठ ), शब्बीर इक्बाल टिनवाला (वय 30), इस्माईल शब्बीर पुनावाला (वय 35), तरबेज इब्राहिम शेख (वय 36),आणि अल्लाउद्दीन इमामुद्दीन शेख (वय 40, चौघे रा. रविवार पेठ) अशी अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत.

त्यांच्यासह आणखी 18 जणांविरोधात फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी अनिरुद्ध इनामदार (वय 20, रा. रविवार पेठ रा. 650, रविवार पेठ, काची आळी) यांनी फिर्याद दिली.
पोटात चाकू लागल्याने देवांग सचिन कंट्रोल्लू (वय 19, रा. काची आळी) हा जखमी झाला असून त्याच्यावर ससून रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
रविवार पेठेत मंगळवारी (ता. १) सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.
अटक केलेल्या आरोपीकडे तपास करीत गुन्ह्यातील इतर आरोपींना अटक करायची आहे.
गुन्ह्यात वापरलेला चाकू तसेच मारहाण करण्यासाठी वापरलेले इतर साहित्य जप्त करण्यासाठी, पोलिसांसमोर भाजीविक्रेत्यांना मारहाण झाली.

कमाईची सुवर्णसंधी ! ‘या’ सरकारी बँकेत पैसे गुंतवा, आगामी 6 महिन्यात मिळतील 60 टक्क्यांहून जास्त रिटर्न, जाणून घ्या

त्यामागचे नेमके काय कारण आहे?याचा शोध घेण्यासाठी अटक केलेल्या 5 ही आरोपीस 7 दिवसाची पोलिस कोठडी द्यावी अशी मागणी सरकारी वकील किरण बेंडभर यांनी केली.
ती न्यायालयाने मान्य केली. न्यायालयाने त्यांना 7 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

 

Pune : डॉक्टरला मारहाण प्रकरणी पोलिसास अटकपूर्व जामीन मंजूर

पुणे : बाणेर येथील कोव्हीड सेंटरमध्ये कार्यरत असलेल्या डॉक्टरांसह व नर्सिंग स्टाफ मारहाण .
केल्याचा आरोप असलेल्या सचिन सिद्धेश्वर गायकवाड या पोलिस कर्मचाऱ्यास न्यायालयाने तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
सत्र न्यायाधीश श्रीमती ए.व्ही. रोट्टे यांनी हा आदेश दिला.

डेडिकेटेड कोव्हीड सेंटरमध्ये कार्यरत असलेल्या डॉक्टरांसह वारंवार कॉल करून देखील पेशंट बद्दल माहिती न दिल्याने सागर गायकवाड याने डॉक्टरांशी हुज्जत घातल्याची तक्रार तेथील डॉक्टर अजयश्री अधिकराव मस्कर यांनी चतुःशृंगी पोलिस स्टेशन येथे केली होती. त्यानंतर चतुःशृंगी पोलीस ठाण्यात देखील डॉक्टर व नर्सिंग स्टाफ यांचेशी हुज्जत घातल्याचा आरोप करत सागर सिद्धेश्वर गायकवाड व सचिन सिद्धेश्वर गायकवाड यांच्याविरुद्ध चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सचिन गायकवाड यांनी तत्काळ त्यांचे वकील ॲड. विजयसिंह ठोंबरे यांच्यामार्फत सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती.
त्यावेळी फिर्यादी हे शासकीय कर्मचारी नसून ते योग्य कामकाज करत नसल्याने जाब विचारल्याचा राग मनात धरून तब्बल सात तासांचा उशीर करून गायकवाड बंधूंवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचा युक्तिवाद आरोपीतर्फे ॲड. ठोंबरे यांनी केला.
या प्रकरणाची हकिगत बघता आरोपीतर्फे केलेला युक्तिवाद मान्य करत सत्र न्यायाधीश ए. व्ही. रोट्टे.
यांनी पोलीस कर्मचारी सचिन गायकवाड यास हंगामी अटकपूर्व जामिनावर मुक्त करण्याचे आदेश दिले.
आरोपीतर्फे ॲड. विजयसिंह ठोंबरे, ॲड. हितेश सोनार, ॲड. अभिजित सोलनकर यांनी कामकाज पाहिले.