‘या’ भाज्या खा अन् मेंदूवरचा ताण करा कमी, स्मरणशक्ती देखील वाढेल, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन :  निरोगी आणि पौष्टिक आहार घेतल्याने बर्‍याच आजारांपासून दूर रहाता येते. याची कल्पना आपल्यापैकी बऱ्याच जणांना आहे. अनेकदा आपण छोट्या छोट्या गोष्टी इथे तिथे ठेवून विसरतो. अशा छोट्या गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी स्मरणशक्ती खूप महत्वाची असते. आपला आहार आपली स्मरणशक्ती वाढवण्यासाठी (Vegetables help in boosting memory) खूप महत्त्वाची असते. आपल्या आहारातील काही पदार्थ आपली स्मरणशक्ती वाढवण्यासाठी मदत करतात. शिवाय अल्झायमर आणि डिमेंशियासारख्या आजारांपासून आपल्याला दूर ठेवतात.

टोमॅटो : टोमॅटो हा स्मरणशक्ती वाढविण्यासाठी खूप महत्त्वाचा घटक आहे. फोर्ब्सच्या संशोधनानुसार टोमॅटोमध्ये लाइकोपीनचे प्रमाण जास्त असते, जे आपल्या शरीरात अँटीऑक्सिडेंट म्हणून काम करते. टोमॅटो आपल्या पेशींना दुषित होण्यापासून वाचवतो. तसेच आपली स्मरणशक्ती वाढविण्यासही मदत करतो. सर्वच भाज्यांमध्ये त्याचा वापर केला जातो. आपण तो कच्चा देखील खाऊ शकतो.

पालक : पालकमध्ये भरपूर प्रमाणात फोलेट, व्हिटॅमिन के, ई असते. हे घटक आपल्या मेंदूला चालना देण्याचे काम करतात. या व्यतिरिक्त आपण आपल्या आहारात कोबी, कोशिंबिरीसाठी वापरण्यात येणारा लेट्युस या हिरव्या भाज्या समाविष्ट करू शकता येते.

ब्रोकोली :  ब्रोकोलीमुळे आपली स्मरणशक्ती सुधारून, ती वाढवण्यास मदत होते. त्यात व्हिटॅमिन के आणि कोलीन सारखे पोषक घटक असतात. ज्यामुळे आपला बुद्धी तीक्ष्ण होते. ब्रोकोलीचा आपल्या आहारात नियमित समावेश केल्यास आपल्या स्मरण शक्तीत वाढ होईलच. परंतु, अकाली येणारे वृद्धत्व देखील प्रतिबंधित होईल.

बीट : हिवाळ्याच्या मोसमात बीट खाणे शरीरासाठी फायदेशीर ठरते. हिमोग्लोबिनची कमी असणाऱ्या लोकांना बीटचा रस पिण्यास सांगितले जाते. याच्या नियमित सेवनाने शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते. बीट स्मरणशक्ती वाढण्यासही मदत करतो. विशेषत: लहान मुले आणि वृद्ध लोक, जे आहारात नेमक्याच गोष्टी खातात त्यांनी डाएटमध्ये बीटाचा समावेश नक्की करावा.

शिमला मिरची : आपल्या अन्ना पदार्थाला वेगवेगळे रंग देणाऱ्या लाल आणि पिवळ्या रंगाच्या बेल पेपर अर्थात शिमला मिरची देखील स्मरणशक्ती वाढविण्यास मदत करतात. विशेषत: लाल बेल पेपरमध्ये आढळणारे व्हिटॅमिन बी 6 आपल्या मेंदूची गती वाढविण्यास मदत करते. यासह ते प्रथिनांचे उर्जेमध्ये रूपांतरित करण्याचे काम करते.