शाकाहारी असाल तर ‘या’ पद्धतीनं बनवा मस्क्युलर बॉडी ! जाणून घ्या महत्त्वाच्या 7 डाएट टिप्स

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  मस्क्युलर किंवा फिट बनण्यासाठी डाएटसंदर्भात काही टिप्स जाणून घेऊयात. अनेक लोक व्यायाम तर करतात परंतु डाएटवर योग्य फोकस करत नाहीत. जाणून घेऊयात शाकाहारी डाएट आणि मीलविषयी सविस्तर माहिती.

1) नाश्त्याआधी वेकअप मील – एक्सरसाईजच्या किंवा वॉकिंगआधी प्रोटीनयुक्त पदार्थ किंवा फळांचं सेवन करा. उपाशीपोटी कधीच सफरचंद किंवा दही खाऊ नका. सकाळी तुम्हाला एनर्जीची गरज असते. म्हणून नाश्त्याआधी वेकअप मील घ्या.

2) असा असावा नाश्ता – मस्कुलर बॉडीसाठी नाश्यात प्रोटीनयुक्त आणि ग्लुकोजयुक्त पदार्थ खावेत. यात तुम्ही पनीर, दूध, पनीर पराठा, कडधान्ये, दही, ओटमील आणि डाळीचं सेवन करू शकता.

3) मिड मॉर्निंग मील – यामध्ये तुम्ही भाज्या, चणे, फळं आणि ड्रायफुट्स याचं सेवन करू शकता. मस्क्युलर बॉडीसाठी तुम्हाला 5-6 भागात डाएट घेणं गरजेचं असतं.

4) लंच मॅनेजमेंट – लंचमध्ये तु्म्ही बीन्स, एक कप ब्राऊन राईस, चपाती, ब्रोकोली किंवा कोबीची भाजी खाऊ शकता. यामुळं ऊर्जा मिळेल.

5 सायंकाळचं वर्कआऊट आणि मील – वर्कआऊटच्या एक तास आधी हलकं काही खावं. यानं तुम्हाला वर्कआऊटसाठी एनर्जी मिळेल. यात तुम्ही टोस्ट, मका, रताळी खाऊ शकता.

6) पोस्ट वर्कआऊट मील – वर्कआऊटच्या 20 मिनिटांनंतर तु्म्ही प्रोटीन शेक, छास, ज्यूस असं सेवन करू शकता. यातून आवश्यक ते न्युट्रिशन आणि प्रोटीन्स मिळतील.

7) डिनर प्लॅन – शरीरात इंसुलिनचं प्रमाणात कायम ठेवण्यासाठी रात्रीचं जेवण खूप महत्त्वाचं असतं. यामध्ये तुम्ही भाज्या बीन्स, पनीर असे पदार्थ खाऊ शकता.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. त्यामुळं काहीही करण्याआधी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like