Vegetarian Diet Reduce Cancer Risk | शाकाहारी लोकांना ‘या’ आजाराचा धोका कमी, रोज नॉनव्हेज खाणार्‍यांनी व्हावे सावध

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Vegetarian Diet Reduce Cancer Risk | शाकाहारी आहाराचे फायदे (Benefits Of Vegetarian Diet) तुम्ही खूप ऐकले असतील. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, शाकाहारी आहार हा सर्वात आरोग्यदायी आहार आहे, जो कोलेस्टेरॉल (Cholesterol) आणि ब्लड प्रेशर लेव्हल (Blood Sugar Level) कमी करतो. हा आहार हायपर टेन्शन (Hypertension), मेटाबॉलिज्म डिसिज (Metabolism Disease), लठ्ठपणा (Obesity), टाईप-2 डायबिटीज (Type-2 Diabetes) आणि हृदयाच्या जोखमीपासून (Heart Risk) संरक्षण करतो (Vegetarian Diet Reduce Cancer Risk).

 

FSSAI देखील लोकांना प्लांट बेस्ड डाएटबाबत (Plant Based Diet) वारंवार जागरूक करत असते. आता एका नवीन संशोधनात असे आढळून आले आहे की, मांसाहार करणार्‍यांपेक्षा शाकाहारी लोकांमध्ये कर्करोगाचा धोका (Risk Of Cancer) खूपच कमी असतो.

 

काय सांगते संशोधन (What Does Research Say) ?
हे संशोधन वर्ल्ड कॅन्सर रिसर्च फंड (World Cancer Research Fund), कॅन्सर रिसर्च यूके (Cancer Research UK) आणि ऑक्सफर्ड पॉप्युलेशन हेल्थ (Oxford Population Health) यांनी केले आहे. 450,000 लोकांवर केलेले हे संशोधन बीएमसी मेडिसिनमध्ये (BMC Medicine) प्रकाशित झाले आहे. या सर्व लोकांना मांस (Meat) आणि मासे (Fish) खाण्याच्या प्रमाणाच्या आधारावर विभागले होते. संशोधनात, नियमित मांस खाणार्‍यांना विशेष श्रेणीत विभागले गेले.

 

उदाहरणार्थ, किती लोकांनी प्रक्रिया केलेले मांस (Processed Meat), रेड मीट (Red Meat) किंवा चिकन (Chicken) आठवड्यातून पाचपेक्षा जास्त वेळा खाल्ले आणि किती लोकांनी त्यापेक्षा कमी खाल्ले. या संशोधनात अशा लोकांचेही विश्लेषण करण्यात आले जे मांस खात नाही तर मासे खात होते. दुसर्‍या गटात असे लोक होते जे पूर्णपणे शाकाहारी (Vegetarian Diet Reduce Cancer Risk) होते.

संशोधनाचे निष्कर्ष (Research Findings) –
संशोधनाच्या निष्कर्षात अनेक महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या. नियमित मांस खाणार्‍यांच्या तुलनेत, ज्यांनी कमी मांस खाल्ले त्यांना कोणत्याही प्रकारच्या कर्करोगाचा धोका 2 टक्के कमी होता. हा धोका फक्त मासे खाणार्‍यांमध्ये 10 टक्के आणि शाकाहारी (Vegetarian) लोकांमध्ये 14 टक्क्यांनी कमी झाला. नियमित मांसाहार करणार्‍यांपेक्षा कमी मांसाहार करणार्‍यांना कोलन कॅन्सरचा धोका 9 टक्के कमी असतो.

 

शाकाहारी महिलांना रजोनिवृत्तीनंतरचा स्तनाचा कर्करोग (Breast Cancer) होण्याचा धोका नियमित मांस खाणार्‍यांच्या तुलनेत 18 टक्के कमी असतो.
त्याच वेळी, प्रोस्टेट कर्करोगाचा धोका शाकाहारी आणि फक्त मासे खाणार्‍यांमध्ये 20 ते 31 टक्क्यांनी कमी झाल्याचे दिसून आले.

 

तज्ज्ञांचा सल्ला (Experts Advice) –
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की शाकाहारी खाल्ल्याने केवळ कोलोरेक्टल किंवा इतर गॅस्ट्रो-इंटेस्टाइनलच (Gastrointestinal) नव्हे,
तर सर्व प्रकारच्या कर्करोगाचा धोका कमी होतो. शाकाहारामुळे सर्व प्रकारच्या कर्करोगांचा धोका 10 ते 12 टक्क्यांनी कमी होतो.
शाकाहारी लोकांमध्ये कोलोरेक्टल कॅन्सर (Colorectal Cancer) होण्याचा धोका मांसाहारी लोकांपेक्षा 22 टक्के कमी असतो.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Vegetarian Diet Reduce Cancer Risk | vegetarian diet reduce cancer risk according to a new study

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Special Public Prosecutor Praveen Chavan | अ‍ॅड. प्रवीण चव्हाण यांची तेजस मोरे याच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार ! गोपनीयतेचा भंग करुन स्पाय कॅमेरा लावून केले चित्रिकरण

 

Pune Crime | पुण्यातील 30 वर्षाच्या तरूणीनं मध्यरात्री दिली सिगारेटची ऑर्डर, 40 वर्षीय डिलीव्हरी बॉयनं पहाटे युवतीसमोरच केलं हस्तमैथुन

 

Governor vs Thackeray Government | राज्यपालांकडून ठाकरे सरकारला आणखी एक धक्का; विशेषाधिकार वापरत घेतला ‘हा’ निर्णय