नवी दिल्ली : Vegetarian Soup For Diabetes Patient | डायबिटीज रूग्णांसाठी काही शाकाहारी पदार्थ खुप लाभदायक ठरतात. कारण यामुळे तब्येत बिघडत नाही. काही विशेष प्रकारचे व्हेजिटेरियन सूप प्यायलात तर ग्लूकोजचा स्तर कमी करण्यात खुप मदत होऊ शकते.(Vegetarian Soup For Diabetes Patient)
हे व्हेजिटेरियन सूप प्यायल्याने कमी होईल ब्लड शुगर लेव्हल (Blood Sugar Level)
१. टोमॅटो सूप (Tomato Soup)
टोमॅटोचे सूप तयार करण्यासाठी टोमॅटो, अर्धा चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, एक चमचा वाटलेला लसून घ्या. पॅन गॅसवर ठेवून त्यामध्ये एक कप पाणी टाका. नंतर सर्व साहित्य टाकून चांगले शिजू द्या. नंतर थंड करून हे मिश्रण मिक्सर ग्रायंडरमध्ये वाटून घ्या. आता पुन्हा गॅसवर गरम करा आणि काळे मीठ टाकून सेवन करा.
२. मसूर डाळीचे सूप (Lentil Soup)
यासाठी भिजवलेली मसूर डाळ, कांदा, गाजर, सिमला मिरची घ्या आणि हे सर्व पॅनमध्ये पाणी घेऊन दहा मिनिटांपर्यंत शिजवा.
शेवटी फ्लेवरसाठी वरून ओव्याची पाने टाका. शिजल्यानंतर हे मिश्रण ब्लेंड करा आणि सेवन करा.
३. मशरूम सूप (Mushroom Soup)
मशरूम सूप प्यायल्याने ब्लड शुगर लेव्हल कमी होते. यासाठी एक कप मशरूम, एक चमचा गव्हाचे पीठ,
अर्धा कप लो फॅट मिल्क, अर्धा कप कापलेला कांदा, एक चमचा तेल आणि चवीनुसार मीठ घ्या.
आता पॅन गॅस ठेवून मंद आचेवर कांदा भाजून घ्या. आता सर्व साहित्य अर्धा कप पाण्यात टाकून ६ ते ७ मिनिटापर्यंत शिजवा.
आता हे मिश्रण दूधात टाकून ब्लेंड करा. आता एका कडईत कुकिंग ऑईल टाकून हे मिश्रण हलक्या आचेवर शिजवा
आणि सेवन करा.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा