Vehicle charging station | राज्यात 100 व्हेईकल चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी सरकारकडून महावितरणला ‘लेटर’

पोलीसनामा ऑनलाइन – Vehicle charging station | राज्य सरकार (State Government) आता एक महत्वपूर्ण निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. राज्यात इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारचा प्रयत्न सुरु आहे. मात्र, महत्वाचे म्हणजे इलेक्ट्रिक वाहनांसाठी 100 नवीन चार्जिंग स्टेशन (Vehicle charging station) उभा करण्याची तयारी देखील चालू आहे. या पार्श्वभूमीवर पहिल्या स्तरात सोलापूर (Solapur) जिल्ह्यासह मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, अमरावती या जिल्ह्यात देखील चार्जिंग स्टेशन उभा करण्यात येणार आहे. याबाबत त्यासाठी जागा शोधून तात्काळ रिपोर्ट सादर करण्याचे पत्र राज्य सरकारने महावितरण विभागाला (MSEDCL) दिले आहे.

Vehicle charging station | msedcl set 100 vehicle charging stations state

दिवसेंदिवस इंधनाचे दर वाढताना दिसत आहेत. त्यामुळे अनेक सर्वसामान्य हतबल झाला आहे. वारंवार वाढणाऱ्या पेट्रोल डिझेलच्या किमतीमुळे (Petrol and diesel prices) आता नागरिकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे ओढ निर्माण होताना दिसत आहे. सध्या पेट्रोलचे दर 100 उलटून गेले आहे. लोकांचा कल पाहता अनेक बड्या कंपन्या इलेक्ट्रिक वाहन तयार करण्याचा प्रयत्न करीत आहेत. तसेच काही कंपन्या देखील इलेक्ट्रिक वाहने तयार करणार आहेत. दरम्यान, वाहन कंपन्या कमीत कमी बजेटमध्ये अधिकाधिक फिचर्स देणाऱ्या इलेक्ट्रिक कार्स, बाइक आणि स्कूटर तयार करीत आहेत, तसेच मुख्यतः म्हणजे ग्राहकांकडून आता इलेक्ट्रिक वाहनांना 80 ते 90 टक्के प्रतिसाद मिळू लागल्याचे समजते.

दरम्यान, महाराष्ट्रात वाहन चार्जिंग स्टेशनची (Vehicle charging station) उभारणी करण्यासाठी राज्य सरकारने महावितरण कंपनीची स्टेट नोडल एजन्सी (State Nodal Agency) म्हणून नेमणूक केलीय. चार्जिंग स्टेशन उभारणे आणि त्यांची संख्या वाढविणे हे उद्दिष्ट महावितरणला देण्यात आले आहे. तसेच, त्यानुसार महावितरण कंपनीने त्वरित जागेचा शोध करून रिपोर्ट सादर करावा, असं राज्य शासनाकडून दिलेल्या पत्रात उल्लेख करण्यात आले आहे. तसेच, वाहन चार्जिंग स्टेशन (Vehicle charging station) उभारणीसाठी महावितरण कंपनीने महावितरणची कार्यालये, उपकेंद्रे, शहरातील मोकळ्या जागा, मैदाने अशा जागांचा विचार करावा. ज्या जागेवर चार्जरसाठी जागा, 1 वाहन बसू शकेल, अशा स्वरूपाची 5 बाय 6 जागा, 1 वाहन प्रतीक्षा करू शकेल आणि हालचाल करण्यासाठी वाहनांना पुरेसा परिसर असावा, अशा जागांचा प्राधान्याने विचार करावा, असं सांगितलं आहे.

सोलापुरात ‘या’ ठिकाणी होणार वाहन चार्जिग स्टेशन –

> विडी घरकुल सबस्टेशन, महावितरण, विडी घरकुल
> एमआयडीसी सबस्टेशन, अक्कलकोट रोड, सोलापूर
> अदित्य नगर सबस्टेशन, विजापूर रोड, सोलापूर
> औद्योगिक वसाहत सबस्टेशन, महावितरण, आसरा चौक
> पेपर प्लांट, सब स्टेशन, सिध्देश्वर कारखानाजवळ, कुंभारी
> जुळे सोलापूर सबस्टेशन, महावितरण, जुळे सोलापूर
> सिव्हील सबस्टेशन, महावितरण कार्यालय, सोलापूर

हे देखील वाचा

PM Cares | कोरोनामध्ये अनाथ झालेल्या मुलांना 10 लाख रुपये… ‘पीएम केयर्स फॉर चिल्ड्रन’ची पूर्ण प्रोसेस काय आहे, कसा करावा लागेल अर्ज; जाणून घ्या

General Transfers | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! अधिकारी, कर्मचार्‍यांच्या सर्वसाधारण बदल्यांना (GT) पुन्हा एकदा मुदतवाढ

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Vehicle charging station | msedcl set 100 vehicle charging stations state

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update