Nitin Gadkari in Loksabha : Scrap Policy मुळे वाहनांच्या किंमती तब्बल ‘इतक्या’ टक्क्यांनी होणार कमी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वाहनांच्या स्क्रॅपिंग पॉलिसीबाबत (Scraping policy) केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी एक महत्वाची माहिती दिली आहे. स्क्रॅपिंग पॉलिसीमुळे वाहनांच्या किंमती कमी होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. गुरूवारी लोकसभेत बोलताना याबाबत माहिती दिली आहे. स्क्रॅपिंग पॉलिसीमुळे प्रदुषण कमी करण्याबरोबरच वाहनांच्या खर्चात ४० टक्क्यांपर्यंत बचत होण्यास मदत मिळणार असल्याचं यावेळी नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.

तसेच स्क्रॅपिंग पॉलिसीमुळे देशात स्क्रॅपिंग सेंट्रस्ममध्ये वाढ होणार आहे. तसेच लहान देशातून ज्या ठिकाणी ही सुविधा नाही तिथून वाहने भारतात आणली जाणार आहे तसेच या धोरणामुळे ॲल्युमिनिअम, तांबे आणि रबर यांसारख्या रिसायकलिंगला चालना मिळेल आणि कंपन्यांना कच्चा माल प्राप्त होईल. त्यामुळे वाहनांच्या उत्पादनाचा खर्च ४० टक्क्यांनी कमी होणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच गडकरी यांनी सांगितले कि, दुचाकी कंपन्या अर्थात Hero, Bajaj, TVS अशा कंपन्यांचा समावेश आहे त्या आपल्या उत्पादनातील एकूण ५० टक्के निर्यात करतात. स्क्रॅप पॉलिसीमध्ये रिसायकलिंगला चालना मिळाल्यामुळे त्यांचा खर्च कमी होईल आणि जगात त्यांची उत्पादनं ही अधिक स्पर्धक बनतील, असा विश्वासही गडकरींनी व्यक्त केला.

दरम्यान, गडकरी यांनी सांगितले की, स्क्रॅपिंग पॉलिसी (Scraping policy) आल्यानंतर आगामी ५ वर्षात देश ऑटो मोबाईलचा भाग बनेल. प्रत्येक जिल्ह्यामध्ये वाहनांची योग्यता तपासण्यासाठी योग्यता आणि प्रदूषण सेंटर उभारले जाणार आहे. तर सध्या ८१ टक्के लिथियम आयन बॅटरी देशात तयार होतात. पुढील वर्षापर्यंत १०० टक्के लिथियम आयन बॅटरी भारतात तयार होतील. त्या मेक इन इंडिया असतील, जसं जसं इलेक्ट्रीक वाहनांचा वापर वाढेल, तसा २ वर्षांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची किंमत सध्याच्या पेट्रोल डिझेलच्या वाहनांप्रमाणेच होईल, असा अंदाज गडकरी यांनी व्यक्त केला. तसेच,जुन्या वाहनांमुळे अधिक प्रमाणात प्रदुषण होतं. ते फिट वाहनांच्या तुलनेत १० ते १२ टक्के अधिक प्रदुषण करतात. यासाठी स्क्रॅपिंग पॉलिसी ही अशी विन पॉलिसी (Win policy) असेल ज्याचा सामान्यांना फायदा होईल. यामुळे प्रदुषण आणि खर्च दोन्ही वाचेल. अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे.