४ सप्टेंबरचा वाहन मोर्चा अधिक तीव्र असेल : सकल मराठा समाज

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणासंदर्भात सप्टेंबर महिन्यात विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलविण्याची धुडकावल्याने कोल्हापुरातील सकल मराठा समाज संतप्त झाला असून ४ सप्टेंबरला मंत्रालयावर काढण्यात येणारा वाहन मोर्चा यापूर्वीच्या मोर्चांपेक्षा अधिक तीव्र असेल. तसेच शुक्रवारी (३१ ऑगस्ट) जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसोबत पुन्हा बैठक घेण्यात येतील, असे सकल मराठा समाजाने म्हटले आहे.

[amazon_link asins=’B071HWTHPH,B0756Z43QS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’bca568da-ac09-11e8-8a04-3b88fe3fc638′]

कोल्हापुरातील दसरा चौकात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी  महिन्याभरापासून सकल मराठा समाज ठिय्या आंदोलन करत आहे. या आंदोलनात लोकप्रतिनिधींची भूमिका ही महत्त्वाची असून आमदार आणि खासदारांनी विशेष अधिवेशनाची मागणी करून आरक्षणाविषयी सभागृहात लढा द्यावा, अशी मागणी सकल मराठा समाजाच्यावतीने केली होती. त्यानुसार आमदार आणि खासदारांच्या शिष्टमंडळाने मुंबई येथे मुख्यमंत्री फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेतली.

सप्टेंबरमध्ये विशेष अधिवेशन बोलविण्याची मागणी आमदार आणि खासदारांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. मात्र, मागासवर्गीय आयोगाचा आहवाल आल्यानंतरच विशेष अधिवेशन बोलविण्याची तारीख निश्चित करू, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाला देवून, विशेष अधिवेशन सप्टेंबरमध्ये घेण्याची मागणी फेटाळून लावली. यामुळे सकल मराठा समाजाने दसरा चौकात सुरु असलेले ठिय्या आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय, ४ सप्टेंबरला मंत्रालयावर काढण्यात येणारा वाहन मोर्चा अधिक तीव्रतेने काढण्याबरोबरच, शुक्रवारी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसोबत शासकीय विश्रामगृह येथे दुपारी चार वाजता पुन्हा बैठक घेवून आंदोलनाची दिशा ठरविण्याचा निर्णय सकल मराठा समाजाने घेतला आहे.

पुण्यात मराठा क्रांती मोर्चाच्या चक्री उपोषणाला सुरुवात

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलने सुरु असून समाजातील लोकांच्या भावना तीव्र आहेत. त्यामुळे राज्य सरकारने आरक्षणाच्या मागणीवर लवकरात लवकर निर्णय घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली. नोव्हेंबरमध्ये विशेष अधिवेशन घेण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले आहे. मात्र, मराठा आरक्षणाचा निर्णय नोव्हेंबरमध्ये झाल्यास त्याची अंमलबजावणी करण्यास डिसेंबरपर्यंतचा अवधी लागणार आहे. त्यातच लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यास कदाचित डिसेंबरमध्ये आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मराठा आरक्षणासंदर्भात सप्टेंबरमध्ये विशेष अधिवेशन घेण्यात यावे, अशी मागणी समाजातून होत आहे.

आंदोलनकर्त्यांनी शांततेला प्राधान्य द्यावे : शरद पवार