वाहनधारकांना मोठा दिलासा ! ‘DL’, ‘RC’, परमीटची मुदत चौथ्यांदा वाढवली, जाणून घ्या नवीन तारीख

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनाच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यामुळे अनेकांचे शासकीय कार्यालयातील कामे खोळांबली आहेत. लॉकडाऊमध्ये शिथिलता देण्यात आल्यानंतर शासकीय कामे करुन घेण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने अनेक कामांना मुदत वाढ दिलेली आहे. यामध्ये ज्या वाहनचालकांचे ड्रायव्हींग लायसन (Driving License), आरसी बुक (RC Book) आणि परमिटची (Permit) व्हॅलिडीटी लॉकडाऊनमध्ये संपलेली आहे. अशा वाहनधारकांना (Vehicle Owner) केंद्र सरकारने दिलासा देत चौथ्यांदा मुदत वाढ दिली आहे. यापूर्वी देण्यात आलेली मुदत 31 डिसेंबर 2020 रोजी संपत आहे. आता ती 31 मार्च 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

केंद्र सरकारच्या नव्या नियमांनुसार जर ड्रायव्हींग लायसन नसेल तर पाच हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. वैधता संपलेले ड्रायव्हींग लायसन म्हणजे विना लायसन मानण्यात येते. यामुळे 1 जानेवारी पासून पुन्हा लायसन तपासणी सुरु होणार आहे. यामुळे आरटीओमध्ये ऑनलाईन, एजंटद्वारे लायसन मुदवाढ, आरसी मुदत वाढ आणि अन्य कामासाठी मोठी गर्दी झाली होती. अनेकांना ऑनलाईन अर्ज केल्यानंतर महिन्यानंतरची तारीख मिळाली. हा सर्व त्रास लक्षात घेत केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने ही मुदत तीन महिन्यांनी पुन्हा वाढवली आहे.

यांनाच मिळणार सवलत
केंद्र सरकारने गर्दी कमी करण्यासाठी मुदत वाढ दिली आहे. मुदत वाढवली म्हणजे ड्रायव्हींग लायसन, आरसी बुक रिन्यू करुन घेऊ नका असे नाही. तर या तीन महिन्यांत गर्दी न करता वाहनचालकांचे काम सोपे व्हावे यासाठी ही मुदत वाढ देण्यात आली आहे. ही सूट केवळ 30 मार्च 2019 नंतर संपलेल्या वाहनचालकांसाठी आहे.

चौथ्यांदा मुदत वाढ
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने लॉकडाऊनमध्ये एक आदेश जारी केला होता. या आदेशानुसार मुदत संपलेले ड्रायव्हींग लायसन, आरसी, फिटने सर्टिफिकेट, परमिट आणि अन्य कागदपत्रांची वैधता 30 जून 2020 पर्यंत वाढवली. परंतु जून मध्ये कोरोनाची परिस्थिती सुधारली नसल्याने ही मुदत 30 सप्टेंबर पर्यंत वाढवण्यात आली. या मुदतीत सरकारने तिसऱ्यांदा वाढ करुन ही मुदत 31 डिसेंबर 2020 पर्यंत वाढवली. आता चौथ्यांदा मुदत वाढ देण्यात आली असून ही मुदत वाढ 31 मार्च 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे.