वाहनांच्या प्रदुषणाने भारतात साडेतीन लाख मुलं अस्थमाग्रस्त

पोलीसनामा ऑनलाइन – देशातील सर्व मोठ्या शहरांमध्ये वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. लाकसंख्येच्या तुलनेत ही वाहनांची संख्या आता धोकादायक पातळीवर पोहचली आहे. पुण्यासारख्या शहरात तर एकुण लोकसंख्येपेक्षा वाहनांची संख्या जास्त असल्याचे पाहणीतून आढळून आले आहे.वाहनांच्या या वाढत्या संख्येमुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. यातील आरोग्याची समस्या ही सर्वात धोकादायक होऊ पहात आहे. वाहनांमुळे होणाऱ्या या प्रदूषणामुळे फुफ्फुस आणि हृदयावर परिणाम होत आहे. शिवाय अस्थमासारख्या अनेक आजारांमध्ये वाढ होत आहे. अस्थमाचा हा आजार लहान मुलांमध्ये बळावत आहे.

वाहनांच्या प्रदुषणामुळे भारतामध्ये साडेतीन लाखांहून अधिक मुले अस्थमाने ग्रस्त आहेत. भारतामध्ये अस्थमाचा आजार जास्त होण्याचे कारण म्हणजे भारतात एकूण लोकसंख्येमध्ये लहान मुलांचे प्रमाण अधिक आहे. तेच अमेरिकेमध्ये अस्थमाने पीडित असणाऱ्या मुलांची संख्या २ लाख ४० हजार, इंडोनेशियामध्ये १ लाख ६० हजार आणि ब्राझीलमध्ये १ लाख ४० हजार होती. जर वायू प्रदूषण कमी करण्यासाठी काही ठोस पावले उचलली तर अस्थमासारख्या आजारावर नियंत्रण मिळविणे शक्य होईल. प्रतिवर्षी एक लाख मुलांमध्ये अस्थमाची १७० नवीन प्रकरणे समोर आली आहेत. यांपैकी लहानमुलांना होणाऱ्या अस्थमाची १३ टक्के प्रकरणं याच प्रदूषणाशी संबंधित आहेत. दक्षिण कोरियामध्ये वाहनांच्या प्रदूषणामुळे होणाऱ्या अस्थमाचे ३१ टक्के प्रकरणं आहेत. या संशोधनामध्ये लांसेट जर्नलने १९४ देशांमध्ये आणि जगभरामध्ये १२५ प्रमुख शहरांचे विश्लेषण केलं आणि सांगितलं की, या लिस्टमध्ये संयुक्त राष्ट्र २४व्या स्थानावर, अमेरिका २४व्या स्थानावर, चीन १९ व्या स्थानावर आणि भारत ५८व्या स्थानावर आहे. चीननंतर या आजाराचे सर्वाधिक रूग्ण भारतात आढळून येत आहेत.

लांसेट प्लेनेटरी हेल्थमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार, वाहनांच्या प्रदुषणामुळे अस्थमाग्रस्त रूग्णांची सर्वाधिक संख्या चीनमध्ये आहे. चीनमध्ये ७ लाख ६० हजार पेक्षाही अधिक मुलांना अस्थमाचा त्रास आहे. चीनमध्ये लहान मुलांची संख्या सर्वाधिक आहे. याव्यतिरिक्त नायटड्ढोजन डायऑक्साइडचे प्रमाण सर्वाधिक आहे. वाहनांच्या प्रदुषणामुळे या ऑक्साइडचे प्रमाण वाढते.

Loading...
You might also like