सावधान ! वाहन नोंदणी आत्‍ताच करून घ्या, नोंदणी शुल्क पाचपट वाढणार, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नवीन वाहनांच्या नोंदणी शुल्कात वाढ करण्याचा केंद्र सरकार विचार करत असल्याची माहिती समोर येत आहे. या नोंदणी शुल्कात पाचपट वाढ करण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव आहे. त्याचबरोबर जुन्या वाहनांच्या नोंदणी शुल्क तसेच हस्तांतरण शुल्कात देखील यामुळे वाढ होणार आहे. त्यामुळे आता नवीन वाहन घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांना आपला खिसा खाली करावा लागणार आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने याबाबतची अधिसूचना २४ जुलै रोजी प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे आता सर्व प्रकारच्या वाहनांच्या नोंदणी आणि हस्तांतरण शुल्कात वाढ होणार आहे. मात्र या सगळ्याला वाहतूक संघटनांनी विरोध केला असून जर हि शुल्कवाढ रद्द नाही केली तर आंदोलनाचा इशारा दिला आहे.

या दरवाढीला महाराष्ट्र राज्य वाहनचालक, मालक महासंघाचे अध्यक्ष बाबा शिंदे, पुणे ऑटो रिक्षा फेडरेशनचे सचिव बापू भावे या दोघांनीं तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. यावेळी त्यांनी बोलताना म्हटले कि, आधीच इंधनाच्या दरात वाढ केलेली असताना त्यावर आता या नोंदणी शुल्कात वाढ करून सरकार सर्व सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडण्याचे काम करत असल्याचे त्यांनी म्हटले. अर्थव्यवस्थेत मंदी असताना सरकार अशा प्रकारे शुल्क वाढवून उत्पादक कंपन्यांचे देखील कंबरडे मोडले जात असल्याचा आरोप देखील त्यांनी सरकारवर केला.

सरकारच्या निर्देशांनुसार कार्यवाही

याविषयी प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले कि, केंद्र सरकारकडून जे आदेश आम्हाला आले आहेत त्याची फक्त अंमलबजावणी आम्ही करत आहोत. त्यामुळे यामध्ये आम्ही काहीही करू शकत नाही.

सूचना पाठवण्याची विनंती

वाहन मंत्रालयाने या सूचनांवर ३० दिवसांच्या आत यावरील काही तक्रारी तसेच सूचना मागवल्या आहेत. त्याचबरोबर काही सुधारणा असतील तर त्या देखील पाठवण्याची विनंती केली आहे. [email protected] या ई-मेलवर या सूचना पाठविण्याचे आवाहन केले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like