Vehicle Registration Renewal New Rules | केंद्र सरकारकडून 15 वर्षावरील वाहन नुतनीकरण फीमध्ये 8 पटीने वाढ, सरकारने निर्णयाचा पुनर्विचार करावा, अन्यथा…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Vehicle Registration Renewal New Rules | देशात 1 एप्रिल 2022 पासून 15 वर्षे जुन्या वाहनांच्या नोंदणीचे नूतनीकरण करणे महागणार आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (Ministry of Road Transport and Highways) ऑक्टोबर 2021 मध्ये एक अधिसूचना (Notification) जारी केली होती. यानुसार 1 एप्रिल 2022 पासून देशभरातील 15 वर्षे जुन्या वाहनांच्या नोंदणीचे नूतनीकरण (Vehicle Registration Renewal New Rules) करणे आठ पटीने महाग होणार आहे. केंद्र सरकारने (Central Government) घेतलेल्या या निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य वाहन चालक मालक व प्रतिनिधी महासंघाने (Maharashtra State Vehicle Owners and Representatives Federation) केली आहे. तसेच या निर्णयाचा पूनर्विचार झाला नाही तर देशव्यापी बंदचा विचार करावा लागेल असा इशारा महासंघाचे अध्यक्ष बाबा शिंदे (Baba Shinde) यांनी दिला आहे.

 

केंद्र सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार 1 एप्रिल 2022 पासून हा नियम लागू (Vehicle Registration Renewal New Rules) होणार आहे. सेंट्रल मोटर व्हेईकल नियमाला Central Motor Vehicle Rules (23वी सुधारणा) नियम, 2021 असे नाव देण्यात आले आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, हा नियम 15 वर्षे जुन्या वाहनांना लागू असेल. ज्यामध्ये दुचाकी (Two-wheelers), चारचाकी (Four Wheelers) आणि व्यावसायिक वाहनांच्या (Commercial Vehicle) नोंदणीचे नूतनीकरण करण्यासाठी पूर्वीपेक्षा आठ पट जास्त शुल्क भरावे लागणार आहे.

 

महाराष्ट्र राज्य वाहन चालक मालक व प्रतिनिधी महासंघाचे अध्यक्ष बाबा शिंदे म्हणाले, केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे देशातील सर्वसामान्य वाहन चालक, प्रवासी, माल वाहतूकदार यांना मोठा आर्थिक फटका बसणार असून यामुळे मेट्रो सिटी (Metro City) वगळता इतर भागातील सर्व जीवनावश्यक वस्तूंचे दर प्रचंड प्रमाणात वाढून महागाई (Inflation) वाढणार आहे. सातत्याने वाढणारे डिझेलचे दर (Diesel rate), तसेच थर्ड पार्टी विमा (Third Party Insurance) यामध्ये वाढ होत आहे. देशातील जिल्हा (District) व ग्रामीण पातळीवर (Village Level) अनेक सर्वसामान्य नागरिक, व्यवसायिक यांचे जीवनमान जुन्या वाहनांवर अवलंबून असून, त्या ठिकाणी नवीन वाहन घेऊन व्यवसाय करणे कठीण होते.

आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या सर्वसामान्य जनता, सर्व व्यावसायिक आधीच त्रस्त असून
या नियमाचा अंमलबजावणीमुळे देशातील अनेक वाहतूक व्यवसायिक नवीन वाहने घेता न आल्यामुळे बेकार होतील.
याकरता याबाबत प्रदूषण (Pollution) करणारे इंजिनाला (Engine) पर्याय द्यावा अशी मागणी आम्ही अनेक वर्षे करीत आहोत.
त्यामुळे या निर्णयाचा केंद्र सरकारने पुनर्विचार करावा अन्यथा देशव्यापी बंदचा विचार करावा लागेल, असा इशारा शिंदे यांनी दिला.

 

कोणत्या वाहनाला किती शुल्क?
परिवहन मंत्रालयाच्या नियमांनुसार, 15 वर्षे जुन्या कारच्या नोंदणीचे नूतनीकरण करण्यासाठी 5 हजार रुपये द्यावे लागतील.
यापूर्वी हे शुक्ल 600 रुपये होते. तसेच जुन्या दुचाकीच्या नोंदणीचे नूतनीकरण करण्यासाठी 1000 रुपये भरावे लागतील.
यापूर्वी ही रक्कम 300 रुपये होती.
यासोबत 15 वर्षे जुन्या बस किंवा ट्रकच्या नोंदणीचे नूतनीकरण करण्यासाठी 12 हजार 500 रुपये द्यावे लागतील,
जे पूर्वी 1500 रुपये होते. तसेच छोट्या प्रवासी मोटार वाहनांच्या नोंदणीसाठी 10 हजार भरावे लागणार आहेत.
यापूर्वी हे शुल्क 1300 रुपये एवढे होते.

 

Web Title :- Vehicle Registration Renewal New Rules | 8 times increase in vehicle renewal fee for 15 years from the central government, the government should reconsider the decision, otherwise …

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Malaika Arora Bold Photo | मलाइका अरोरानं फक्त कोट घालून शेअर केला फोटो, व्हायरल फोटो पाहून नेटकऱ्यांच्या हृद्याचे वाढले ठोके

 

Alia Bhatt Oops Moment | आलिया भट्ट झाली Oops Moment ची शिकार, खूर्चीवर बसत असतानाच…

 

Ananya Panday Glamrous Look | अनन्या पांडेनं काळ्या रंगाचा पारदर्शक ड्रेस घालून दिल्या हॉट पोज, मादक फोटो पाहून नेटकरी झाले घायाळ