वाहन चोरी करणारे सराईत गजाआड, 18 दुचाकीसह एक चारचाकी जप्त

पुणेः पोलीसनामा आॅनलाईन

वाहन चोरी करणाऱ्या दोन सराईतांना विशेष पथकांच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून, 18 दुचाकी व एका चारचाकीसह तब्बल 10 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. हर्षवर्धन गाैतम घोडके (वय-25, रा. मिरजगाव, ता. कर्जत, जि. अहमदरनगर), युवराज अर्जुन ढोणे (वय-20, रा.मिरजगाव, ता. कर्जत, जि. अहमदनगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

शहरातील वाढत्या वाहन चोरीच्या घटना रोखण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष वाहन चोरी पथकाने 12 आॅगस्ट रोजी सायंकाळी हडपसर पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये गस्त घालत असताना दोन व्यक्ती पार्किंगमधील गाड्यांना चाव्या लावताना दिसून आले.  दोन्ही संशयीत इसमांना ताब्यात घेवून त्यांची झडती घेतली असता अनेक गाड्यांच्या चाव्या, स्क्रु ड्रायव्हर, पक्कड असे साहित्य मिळून आले. विश्वासात घेवून वाहन चोरीबाबत त्यांना विचारले असता सुरूवातीला त्यांनी उडवा-उडवीची उत्तरे दिली. मात्र शेवटी पोलिसी खाक्या दाखवताच,पुणे ग्रामिण भागातून दुचाकी व हडपसर येथून चारचाकी गाडी चोरल्याचे कबूल केले.
[amazon_link asins=’B07G3XM21W,B075KDK57C’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b9db3dcd-9fb5-11e8-ae28-7535487bd9b3′]
सदर चोरीच्या वाहनांमध्ये हडपसर, दिघी, शिवाजीनगर, विश्रामबाग, मार्केटयार्ड, करमाळा, बार्शी, पंढरपूर, टेंभूर्णी, अहमदनगर, या पोलीस स्टेशनच्या हद्दीतून गाड्या चोरल्याचे तपासात समोर आलं आहे. सदरची कारवाई सहायक आयुक्त मिलींद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल तांबे, पोलीस उपनिरीक्षक मंगेश भांगे, पोलीस हवालदार पठाण, पोलीस नाईक प्रताप गायकवाड, पोलीस नाईक विनोद शिवले, पोलीस कर्मचारी नितीन मुंढे, अकबर शेख, नाळे यांच्या पथकाने केली.