शहरात वाहन चोरट्यांचा धुमाकूळ ; 6 वाहने चोरली

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – पिंपरी चिंचवड शहरातील पोलीस यंत्रणा सुस्त झाली असून वाहन चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. निगडी, चाकण, वाकड, हिंजवडी, सांगवी परिसरात वाहन चोरीच्या सहा घटना घडल्या आहेत. 6 घटनांमध्ये एकूण 1 लाख 55 हजार रुपयांच्या दुचाकी चोरून नेल्या आहेत.
गोविंद सिताराम इंगळे (65, रा. पिंपळगाव दावडी, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोविंद यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांनी त्यांची 15 हजार रुपये किमतीची (एम एच 14 / 3606) ही दुचाकी राहत्या घरासमोर पार्क केली. बुधवारी (दि. 30) अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली. गुरुवारी पहाटे हा प्रकार उघडकीस आला. चाकण पोलिस तपास करीत आहेत.

अमित हनुमंत नलवडे (26, रा. थेरगाव) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमित यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अमित यांनी त्यांची 20 हजार रुपये किमतीची (एमएच 14 / डी व्ही 0250) ही दुचाकी काळेवाडी येथील ज्योतिबा गार्डन समोर पार्क केली अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली. वाकड पोलिस तपास करीत आहेत.

लकी घनश्याम कपलानी ( 30, रा. पिंपरी) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लकी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांनी त्यांची (एम एच 14 / जीझेड 5147) ही मोटार हिंजवडी येथील इंडियन ऑईल पेट्रोल पंपासमोरील चौकात 23 ते 24 ऑक्टोबर या कालावधीत पार्क केली. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांची मोटार चोरून नेली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

सुहास शामसुंदर क्षीरसागर ( 66, रा. पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दिली. सुहास यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सुहास यांच्या भावाने 15 ते 16 ऑक्टोबर या कालावधीत त्यांची 25 हजार रुपये किमतीची (एम एच 12 / क्यू ए 1102) ही रिक्षा पिंपळे गुरव येथील सार्वजनिक रोडवर पार्क केली. रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी रिक्षा चोरून नेली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

सुरज व्यंकटराव सूर्यवंशी (24, रा. भोसरी) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दिली. सुरज यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांनी 24 ते 31 ऑक्टोबर या कालावधीत त्यांची (एम एच 24 / ए के 2647) ही 20 हजार रुपये किमतीची दुचाकी फेज 2 येथील विप्रो कंपनी समोर पार्क केली. अज्ञात चोरट्याने त्यांची दुचाकी चोरून नेली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

ओंकार माधव सिनारे (31, रा. निगडी प्राधिकरण) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ओंकार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ओंकार यांनी त्यांची दुचाकी 26 ते 31 ऑक्टोबर या कालावधीत राहत्या घरी पार्क केली. ते आपल्या कुटुंबासोबत दिवाळीच्या सणानिमित्त मूळ गावी गेले. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली. हा प्रकार गुरुवारी सकाळी साडे सातच्या सुमारास उघडकीस आला. निगडी पोलिस तपास करीत आहेत.

Visit : Policenama.com