दारु पिण्यासाठी करायचे वाहन चोरी, पोलिसांनी ठोकल्या बेड्या 

पुणेः पोलीसनामा आॅनलाईन-

दारु पिण्यासाठी वाहन चोरी करणाऱ्यां दोघांना गुन्हे शाखा युनिट तीन च्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. गर्दीच्या ठिकाणी, बागेलगतच्या परिसरात किंवा सार्वजनिक ठिकाणी पार्क केलेल्या दुचाकी मास्टर चावीच्या साह्याने चालू करुन आरोपी चोरी करत होते. आत्तापर्यंत आरोपीच्या ताब्यातून तब्बल 5 लाख 5 हजार रुपयांच्या 17 दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
[amazon_link asins=’B077PWBC7J’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’cbd8a3b7-9a4a-11e8-a19f-81a20f52aef1′]

आसिफ गुलाब शेख (वय-23, रा. पारगाव खंडाळा, अदीत्य डेव्हलपर्स दत्तमंदीर रोड), अमित शिवाजी चव्हाण (वय-29, पारगाव एस टी डेपो जवळ ता. खंडाळा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहे.

शनिवार (4 आॅगस्ट) रोजी गुन्हे शाखा युनिट तीन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप देशमाने यांना आपल्या गुप्त बातमीदारामार्फेत बातमी मिळाली होती की, काही इसम पुण्यातून मोटरसायकल चोरी करुन इतर भागात विक्री करण्यासाठी येत आहेत. त्यानुसार दोघांना सातारा जिल्ह्यातील पारगाव येथून ताब्यात घेऊन त्यांच्याकडे वाहन चोरीच्या गुन्ह्याबाबत चाैकशी केली असता, त्यांनी पुणे शहर व पुणे ग्रामिण भागातून दुचाकी मोटारसायकली चोरी केल्याचे कबूल केले.

आरोपीना ताब्यात घेवून गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना,हडपसर पोलीस ठाण्याकडील 9, भारती विद्यापीठ पोलीस ठाणे कडील 3,यवत पोलीस ठाणे पुणे ग्रामिण कडील 1, तर भोर पोलीस ठाणे कडील 1 असे 14 चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपीनी चोरी केलेल्या मोटारसायकली ग्रामिण भागात नेवून  3 ते 4 हजार रुपयांना विक्री केल्या असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपींना कोर्टात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 7 आॅगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
[amazon_link asins=’B0746JXMWV’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d1a615d8-9a4a-11e8-b881-87593dc830f9′]

वरिल कामगिरी पोलीस आयुक्त डाॅ. के. व्यंकटेशम्, सह पोलीस आयुक्त शिवाजी बोडके, गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त प्रदिप देशपांडे, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहाय्यक पोलीस आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनकर मोहिते, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप देशमाने, पोलीस कर्मचारी अशोक भोसले, रोहिदास लवांडे, गजानन गाणबोटे, अतुल साठे, संदीप तळेकर, सुजित पवार, मच्छिंद्र वाळके, शिवानंत स्वामी, निलेश पाटील, संदिप राठोड,कल्पेश बनसोडे, संदीप गिऱ्हे यांनी केली.