Pimpri News : पिंपरीत कोयत्याने वाहनांची तोडफोड

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  येथे नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पिंपरी-चिंचवड शहरात वाहनांची तोडफोड करण्याचा प्रकार घडला. रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास मोहन नगर चिंचवड येथे ही घटना घडली. या प्रकरणी अल्पवयीन मुलासह १३ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. नववर्षाचं सेलिब्रेशन करताना मद्यपान केलेल्या दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. यातूनच दोन गटातील आरोपींनी कोयत्याने सहा वाहनांची तोडफोड केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही तरुण मोहन नगर चिंचवड या ठिकाणी नववर्षाचं सेलिब्रेशन करण्यासाठी एकत्र आले होते. त्यांनी मद्यपान केलं. परंतु, किरकोळ कारणावरून त्यांच्यात वाद झाले. यातूनच रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या सहा चारचाकी आणि रिक्षांचा काचा कोयत्याने फोडून हुल्लडबाजी केली. रात्री साडेबाराच्या सुमारास ही घटना मोहन नगर चिंचवड येथे घडली. रात्रभर आरोपींचा शोध घेऊन तोडफोड प्रकरणी एकूण १३ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं. दरम्यान, या प्रकरणामुळे पिंपरी पोलिसांची दमछाक झाल्याचं पाहायला मिळत आहे. वर्षाची सुरुवातच तोडफोडीच्या सत्राने झाली. परिणामी, नागरिकांमध्ये पोलिसांविषयी नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.