आज पासून वाहनांचा ‘थर्ड पार्टी’ विमा महागला, वाहनांच्या किंमतीत १ ते ११ हजार रूपयांची ‘वाढ’

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  दुचाकी, चारचाकी आणि इतर अवजड वाहनांच्या थर्ड पार्टी विम्याच्या हप्त्यामध्ये वाढ झाली असून ती आज पासुन म्हणजेच (दि. 16 जून) लागू झाली आहे. त्यामुळे नवीन वाहन खरेदी आणखी महाग होणार आहे. अलिकडील काळात वाहन खरेदी मंदावली असतानाच हा नियम लागू झाल्याने अनेक कंपन्यांना याचा फटका बसणार आहे. नवीन दुचाकीसाठी 5 वर्ष तर चारचाकीसाठी 3 वर्षाचा थर्ड पार्टी विमा करणे गरजेचे आहे. चारचाकी वाहनांच्या विमा हप्त्यात 12.5 टक्के पर्यंत तर दुचाकी वाहनांच्या हप्त्यात 21 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. त्यामुळे दुचाकी किंमत 350 ते 1000 आणि चारचाकी वाहनांची किंमत 6 ते 11 हजार रूपयांनी वाढली आहे.

याबाबत ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे सरचिटणीस नवीन गुप्‍ता यांनी सांगितले आहे. ते म्हणाले, गेल्या वर्षीच विमा 18 ते 23 टक्क्यांनी वाढविण्यात आला होता. तत्कालीन अर्थमंत्री पियुष गोयल यांनी याबाबत आयआरडीला पुन्हा विचार करण्यास सांगितले होते. मात्र, त्यावर विचार करण्यात आला आहे. यंदा व्यावसायिक वाहनांच्या विम्याचा हप्‍ता 6 ते 11 टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे. एक्सीडेंट क्‍लेम ट्रिब्युनल जवळ कोणातीही तंतोतंत माहिती नाही केवळ पुर्वीच्या आकडयांच्या आधारावरून विम्याच्या हप्त्यात वाढ करण्यात आली आहे. काही जणांकडून अपघात झाल्यानंतर चार-पाच वर्षानंतर क्‍लेम करण्यात येतो. त्यामध्ये फसवणूकीची अधिक शक्यता असते. नवीन गुप्‍ता यांच्या म्हणण्यानुसार खासगी वाहनांना नो क्‍लेम बोनस मिळतो पण व्यावसायिक वाहनांना नो क्‍लेम बोनस मिळत नाही. एकंदरीतच थर्ड पार्टी विमा महागल्यामुळे वाहनांच्या किंमतीत वाढ झाली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

कमी वयात हार्ट अ‍ॅटॅक येण्याचे प्रमाण का वाढतेय ?

दिवसभर उत्साहित राहण्यासाठी हे व्यायाम आवश्यक

नवजात बाळांच्या ‘या’ रंजक गोष्टी तुम्हाला माहित आहेत का ?

डोळ्यांच्या इन्फेक्शनपासून असा करा बचाव