‘खेड-शिवापूर’, ‘आणेवाडी’ टोलनाका 24 तासासाठी ‘टोल’ फ्री !, जाणून घ्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे-बंगळुरू महामार्गावर वाहनांना टोल फ्री सोडण्यात येणार आहे. आज (सोमवार) सायंकाळी सात ते मंगळवार संध्याकाळी सात वाजेपर्यंत या मार्गावरील वाहनांकडून टोल आकरण्यात येणार नाही. या मार्गावरील खेड शिवापूर आणि आणेवाडी टोल नाक्यावरून वाहनांना पुढील चोवीस तास टोल फ्री सोडण्याचे आदेश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिले आहेत.

रस्त्यावर पाणी आल्याने मागील सहा दिवसांपासून पुणे-बंगळुर हा माहामार्ग कोल्हापूरजवळ वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. मात्र, सोमवारी सकाळपासून या रस्त्यावरून कोल्हापूरला जाणारी वाहतूक सुरु झाली. त्यामुळे मागील काही दिवसांपासून या रस्त्यावर अडकून पडलेली वाहने कोल्हापूरकडे जाण्यास सुरुवात झाली आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये पूरामुळे हाहाकार माजला असून तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक नागरिकांना स्थलांतरीत करण्यात आले आहे. स्थलांतरीत करण्यात आलेल्या नागरिकांसाठी राज्यभरातून मदत पोहचवली जात आहेत. मदत घेऊन जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठी असल्याने या मार्गावरील टोल नाक्यावरून वाहनांना टोल आकारण्यात येऊ नये असा आदेश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिला आहे.

याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस म्हणाले, मागील अनेक दिवसांपासून पुणे-सातारा रस्त्यावर कोल्हापुरकडे जाणारी वाहने अडकून पडली होती. आज या रस्त्यावरील वाहतूक पुर्ववत सुरु झाली आहे. या वाहनांना अडचणी येऊ नयेत, तसेच वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी टोलवरून पुढील चोवीस तासासाठी वाहने टोल फ्री सोडण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. मंगळवारी (दि.१३) सायंकाळी सात वाजेपर्य़ंत सर्व वाहने टोल फ्री सोडण्यात येणार आहेत.

आरोग्यविषयक वृत्त

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like