Vekananda Kendra Kanyakumari | ‘धन्यो गृहस्थाश्रमः’ विषयावर २६ मार्च रोजी व्याख्यान ! ‘विवेकानंद केंद्र कन्याकुमारी’ पुणे शाखेकडून वसुंधराताई सातवळेकर स्मृती व्याख्यानाचे आयोजन

पुणे : Vekananda Kendra Kanyakumari | ‘विवेकानंद केंद्र कन्याकुमारी’ या संस्थेच्या पुणे शाखेकडून ‘धन्यो गृहस्थाश्रमः’ या विषयावर सौ. वसुंधराताई सातवळेकर स्मृती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे (Vekananda Kendra Kanyakumari). रविवार,२६ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता सावरकर स्मारक सभागृह(कर्वे रस्ता,डेक्कन) येथे हे व्याख्यान होणार आहे. अभ्यासक माधवी जोशी हे व्याख्यान देणार आहेत. (Pune News)

‘विवेकानंद केंद्र कन्याकुमारी’ या संस्थेच्या (Vekananda Kendra Kanyakumari) पुणे शाखेचे (Pune Branch) प्रमुख जयंत कुलकर्णी (Jayant Kulkarni) यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. ‘भारतीय संस्कृती’ मधील ब्रह्मचर्याश्रम,गृहस्थाश्रम,वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम या चार आश्रमातील ‘गृहस्थाश्रम’ महत्त्वाचा आहे , कारण तो इतर तीनही आश्रमांचा आधार आहे. याबद्दलच अधिक जाणून घेण्यासाठी खासकरून जे गृहस्थाश्रम स्वीकारणार आहेत अशा तरुणांनी व्याख्यानाला जरूर यावे,असे आवाहन त्यांनी केले आहे. (Pune News)

समर्पित जीवनमार्गाच्या स्मृती जपण्यासाठी उपक्रम

सौ. वसुंधराताई सातवळेकर यांनी पत्रद्वारा दासबोधाच्या सर्व परीक्षा पूर्ण करुन त्यांनी दासबोधाचा नुसता अभ्यासच नव्हे तर दासबोध प्रत्यक्ष जीवनात उतरवलेला होता.
समर्थ रामदास स्वामी आणि स्वामी विवेकानंद हे दोघे योद्धे संन्यासी त्यांचे आदर्श होते.
त्यांच्या कार्याचा, उपदेशाचा जीवनात कसा उपयोग करायचा हे सौ. वसुंधराताईंनी अनेक मार्गांनी शिकवले.
त्यांनी लहान मुलांसाठी संस्कार वर्ग घेतले आणि मोठ्यांसाठी प्रवचनेही केली.
त्याचप्रमाणे गोष्टीरुप मनाचे श्लोक आणि एकनाथांचे भारुड यावर पुस्तके लिहीली.
वसुंधराताईंच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांचे पती भालचंद्र सातवळेकर यांच्या सहकार्याने विवेकानंद केंद्र पुणे गेल्या
वीस वर्षांहून अधिक काळ सौ वसुंधराताई सातवळेकर स्मृती व्याख्यान आयोजित करते आहे.

Web Title :-  Vekananda Kendra Kanyakumari | Lecture on ‘Blessed is the Household’ on March 26! Vasundharatai Satavalekar Memorial Lecture organized by ‘Vivekananda Kendra Kanyakumari’ Pune Branch

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mukesh Chhabra | अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या नैराश्याबद्दल मुकेश छाबरा यांनी केला मोठा खुलासा; म्हणाले….

Beed Crime News | क्षुल्लक कारणावरुन झालेल्या वादातून पतीकडून पत्नीची डोक्यात दगड घालून निर्घृणपणे हत्या

Maharashtra Local Body Election | ‘तारीख पे तारीख’, महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत सुनावणी पुन्हा पुढे ढकलली