‘लालपरी’ पुढं नतमस्तक झाला ‘तो’, ढसाढसा रडला ‘कंडक्टर’

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोनाच्या महामारीमुळ राज्याची लाइफलाइन असलेल्या लालपरी अर्थात एसटीचे चाक रुतले आहे. त्याचा फटका कर्मचार्‍यांना बसला आहे. अशाच एका कर्मचार्‍याचा मन हेलावून टाकणारा फोटो व्हायरल झाला आहे. वेंगुर्ला बस स्थानकावर एका कंडक्टरचा फोटो काळीज धस्स करणार आहे. आपल्या कामावर जीवापाड प्रेम करणार्‍या कंडक्टरने निरोप घेताना बससमोर गुडघ्यावर बसून ढसाढसा रडत लालपरीचा निरोप घेतला.

वेंगुर्ला बस स्थानकावर कंडक्टर म्हणून काम करणारे सी.बी. जाधव यांचा हा फोटो आहे. दोन दिवसांपूर्वीच जाधव यांनी सेवानिवृत्त झाले होते. गेली अनेक वर्ष या स्थानकात काम करत असताना आज असे अचानक स्थानकातून बाहेर पडत असताना त्यांचे डोळे भरून आले. लालपरीसमोर ते गुडघ्यावर बसले आणि हात जोडून ’आता मी तुझा निरोप घेतो’ असे म्हणून अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

जाधव हे मुळचे सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्यांचे वडीलही परिवहन महामंडळात कामाला होते. सावंतवाडीमध्ये ते काम करत होते. त्यानंतर जाधव कुटुंबीय सावंतवाडीत स्थायिक झाले. वडिलांच्या निवृत्तीनंतर त्यांचा वारसा जपत जाधवही महामंडळात कामाला लागले. तब्बल 38 वर्ष त्यांनी कंडक्टर म्हणून काम केले.