रजनीकांत यांच्या मुलीनंतर आता ‘या’ साऊथ हिरोची मुलगी करणार लग्न 

वृत्तसंस्था – बॉलिवूड असो वा टॉलिवूड लग्नाच्या या सीजनमध्ये अनेक सेलिब्रेटी आजपर्यंत लग्नबंधानात अडकले आहे. नुकतेच रजनीकांत यांची मुलगी सौंदर्या हिचे प्री वेडिंग रिसेप्शन झाले. लवकरच ती दुसरं लग्न करणार आहे. रजनीकांत यांच्यानंतर आणखी एका साऊथच्या सुपरस्टारच्या मुलीचे लग्न होणार आहे.

साऊथ अभिनेता व्यंकटेश डग्गुबती याची मुलगी आश्रिता लवकरच लग्न करणार असल्याचे वृत्तसमोर आले आहे. आश्रीताने ६ फेब्रुवारीला बॉयफ्रेंड सोबत साखरपुडा केला होता. हैद्राबाद येथे झालेल्या या समारंभात जवळचे नातेवाईक आणि मित्रपरिवार उपस्थित होते.

साखरपुड्यानंतर या लग्नाची तारीख सुद्धा आता समोर आली आहे. आश्रिता १ मार्चला लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. हे लग्न हैद्राबाद येथे शाही थाटात पार पडणार आहे. सुत्रानुसार या लग्नाची रिसेप्शन पार्टी  रामानायडू स्टूडियो येथे होणार आहे. या पार्टीत बॉलिवूड आणि टॉलिवूडचे अनेक मोठे कलाकारही उपस्थित राहणार आहे. आश्रिता एक बिजनेस वूमन आहे. आश्रीताचा होणारा नवरा हैद्राबादच्या रेस क्लबचा अध्यक्ष आहे.

व्यंकटेशने अनेक हिट चित्रपट दिले त्यामुळे त्याला ‘विक्ट्री वेंकटेश’ म्हणूनही ओळखले जाते. व्यंकटेश अनाडी (१९९३)आणि ताकदीरवाला (१९९५) यासारख्या हिंदी चित्रपटांमध्ये दिसला होता. त्याचे वडील डी रामानायडू प्रसिद्ध निर्माते होते.

Loading...
You might also like