आज ‘कुंभ’ राशीत ‘शुक्र’, ‘या’ 5 राशींची तर ‘चांदी’च, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – धन, ऐश्वर्य आणि सर्व प्रकारच्या भौतिक सुखांचा कारक शुक्र 9 जानेवारी रोजी आपला मित्र ग्रह शनीची राशी कुंभमध्ये प्रवेश करणार आहे. शुक्राच्या या संक्रमणाचा कालावधी 3 फेब्रुवारीपर्यंत असणार आहे. यानंतर तो आपली उच्च रास मीनमध्ये प्रवेश करणार आहे. शुक्राच्या कुंभ राशीवर संक्रमणाचा तुमच्यावर नेमका काय प्रभाव पडणार आहे हे जाणून घेऊयात.

1) मेष तुमच्या उत्पन्नात वाढ होईल. तुम्ही व्यवसाय वाढूव शकाल. जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर त्यात नवीन भागिदारी होईल. समाजात प्रभुत्व असणाऱ्या लोकांसोबत संपर्क होईल. मौज-मजेत वेळ जाईल.

2) वृषभ– तुम्हाला तुमच्या कामावर विशेष लक्ष द्यावं लागेल. फालतू गोष्टी कराल तर तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो. कार्यक्षेत्रात आळस करू नका. तुम्ही तुमच्या कामावर फोकस केलेलं चांगलं राहील. हेच तुम्हाला यश मिळवून देईल.

3) मिथुन– नशीब तुम्हाला साथ देईल. दीर्घकाळापासून अडकलेली कामे पूर्ण होतील. यातून केवळ आर्थिकच नाही तर व्यवसायात लाभ होऊन गती वाढेल.

4) कर्क– विनाकारण झालेल्या प्रवासामुळे तुमचा खर्च वाढेल. त्यामुळे तसे करणे टाळा. आर्थिक जीवनात चढ-ऊतार येतील. आईसोबतच्या संबंधावर परिणाम होऊ शकतो. त्यासाठी काळजी घ्या.

5) सिंह– तुमच्या वैवाहिक जीवनात प्रेमाचा वर्षाव होईल. तुम्ही तुमच्या काही प्रयत्नातून व्यवसायाला फायदा मिळवून द्याल. तुमच्या क्षेत्रात तुमची प्रगती होईल.

6) कन्या- ही वेळ तुमच्यासाठी थोडी कठिण आहे. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. तुमचे खर्च वाढण्याची शक्यता आहे. यशासाठी तुम्हाला अथक परिश्रम घ्यावे लागतील. महिलांचा सन्मान करा.

7) तुळ- मुलं होण्याची शक्यता आहे. शिक्षण क्षेत्रातील तुमची कामगिरी कौतुकास्पद असेल. गुरुजनांकडूनही आशीर्वाद मिळेल. प्रेम जीवनात प्रेम आणि रोमँस वाढणार आहे.

8) वृश्चिक- या काळात तुमच्या सुखात वृद्धी होईल. आईलाही सुख मिळेल. वैवाहिक जीवन चांगलं असेल. तुमची संपत्ती वाढवू शकता.

9) धनु- लघु यात्रेचा योग आहे. यामुळे तुम्हाला आनंद मिळेल. लहान भाऊ-बहिण तुमच्या पाठिशी उभे राहतील. तुम्हाला शक्य ती प्रत्येक मदत ते करतील.

10) मकर- तुमचं संवाद कौशल्य विकसित होईल. कुटुंबात सुखाची वृद्धी होईल. चांगले अन्न आणि पाककृती चाखण्याची संधी मिळेल.

11) कुंभ- हे संक्रमण तुमच्यासाठी सकारात्मक बदल घडवून आणेल. तुम्ही मानसिकरित्या खूपच खुश रहाल. प्रत्येक कार्यात चढा-ओढीने सहभाग घ्याल. तुमचा जोश चांगला असेल. व्यक्तिमत्व सुधारेल.

12) मीन- या काळात तुमच्या खर्चात अचानक वाढ होईल. काही खर्च व्यर्थच्या कामासाठी होतील. काही खर्च तुमच्या आपापसातील सुख-सुविधांसाठी होतील. सासरच्या लोकांवरही तुमचा खर्च होईल.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/