‘त्यांनी’ माझा सर्वात मोठा ‘अपेक्षाभंग’ केला, फडणवीसांनी केली ‘मन की बात’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात महाविकासआघाडीने सत्ता स्थापन करुन भाजपला सत्तेपासून दूर ठेवले. त्याआधी भाजपने राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना सोबत घेऊन सत्तास्थापन केली होती. परंतू भाजपचा तो प्रयत्न फसला आणि भाजप सरकार 80 तासात कोसळलं. यावर देवेंद्र फडणवीस यांनी अखेर भाष्य केले. अजित पवारांना सोबत घेऊन देखील सत्तास्थापन करता आली नाही आणि उद्धव ठाकरेंना देखील सोबत घेऊन सत्तास्थापन करता आली नाही. यामुळे सर्वात मोठा अपेक्षाभंग कोणी केला यावर फडणवीस व्यक्त झाले.

राज्यात जवळपास एक महिना सत्तास्थापनेवरुन संघर्ष सुरु होता. परंतू सर्वात मोठा अपेक्षाभंग शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंना केल्याचे फडणवीस म्हणाले. फडणवीस म्हणाले की राज्यातल्या मतदारांनी महायुतीला स्पष्ट कौल दिला होता. परंतू उद्धव ठाकरे यांनी निकाल लागताच आम्हाला सर्व पर्याय खुले असल्याचे म्हणाले होते. त्यानंतर शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर चर्चा सुरु केली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी बोलायला शिवसेनेकडे वेळ होता. परंतू माझा फोन घ्यायला वेळ नव्हता.

फडणवीस म्हणाले की शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडे सत्तास्थापनेसाठी बोलणी सुरु केल्यानं आम्हाला अजित पवारांना सोबत घेऊन सत्ता स्थापन करावी लागली. आम्ही अजित पवारांकडे गेलो नव्हतो. ते आमच्याकडे आले होते. त्यांनी आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र दिल्याने आम्ही सत्तास्थापनेचा दावा केला आणि सकाळी शपथविधी घेतला.

यावेळी फडणवीस यांनी गौप्यस्फोट केला की या सर्वाची कल्पना शरद पवारांना होती. मात्र त्यांनी सांगितलेल्या गोष्टी या अर्धसत्य आहेत. पंतप्रधान मोदी आणि शरद पवार यांच्यात नक्की काय चर्चा झाली होती हे पुढे कळलेच.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/