फायद्याची गोष्ट ! केवळ 10 हजाराची गुंतवणूक करून मिळवा 16 लाखांचा ‘लाभ’, जाणून घ्या पोस्टाच्या ‘या’ भन्नाट स्कीमबद्दल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सुरक्षित गुंतवणूक secure investment योजना आपल्याला हवी आहे का ? तुम्हाला गुंतवणूकीवर कोणत्याही प्रकारची जोखीम नको ना … आता तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे. पोस्ट ऑफिसच्या अल्पबचत योजना अधिक चांगल्या असून यात चांगला परतावा मिळतो. या योजनांमध्ये अगदी कमी खर्चात गुंतवणूक secure investment करता येते, त्या तुलनेत परतावा अतिशय चांगला मिळतो. पोस्ट ऑफिसच्या अशा विविध योजनांपैकी पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट योजना ही एक उत्तम योजना आहे. कमी गुंतवणुकीत चांगला फायदा मिळवण्याचा हा एक उत्तम पर्याय आहे.

RBI कडून कोटयावधी छोट्या व्यावसायिकांना (MSME) मोठा दिलासा ! कर्जाच्या पुर्नबांधणीची मर्यादा दुप्पटीने वाढली, जाणून घ्या

जाणून घ्या पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट योजना :
यात तुम्ही दरमहा १०० रुपयांपासून गुंतवणूक करू शकता.
तर गुंतवणूकीला कमाल मर्यादा नाही. ही योजना ५ वर्षांसाठी असते.
पोस्ट ऑफिस Post Office आरडी डिपॉझिट अकाउंट (Recurring Deposit Account) ही एक सरकारी खात्रीशीर योजना आहे.
या योजनेत तुम्ही अगदी कमी पैशात गुंतवणूक करू शकता.
याशिवाय तुमचे पैसेही पूर्णपणे सुरक्षित असतात. दर तिमाहीत जमा झालेल्या पैशांवर चक्रवाढ पद्धतीनं व्याज जमा होते.
पोस्ट खात्याच्या वेबसाइटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार सध्या या योजनेवर ५.८ टक्के दरानं व्याज देण्यात येत आहे.

या योजनेबाबत काही महत्त्वाच्या बाबी :
या योजनेत आपण हप्ता वेळेवर जमा न केल्यास आपल्याला दंड भरावा लागेल. हप्ता भरायला उशीर झाल्यास दरमहा एक टक्का दंड भरावा लागेल. तसंच सलग ४ हप्ते जमा न केल्यास खातं बंद होईल. खातं बंद झाल्यास, २ महिन्यांनी पुन्हा सुरू केलं जाऊ शकते.

केंद्र सरकार आपल्या सर्व अल्पबचत योजनांसाठी दर तिमाहीला व्याज दर जाहीर करते. त्यामुळं या योजनेचे व्याजदरही दर तिमाहीला बदलतात.

१० हजार रुपयांची गुंतवणूक केली तर १६ लाखांपेक्षा जास्त रक्कम मिळेल :

– या योजनेत तुम्ही दहा वर्षांसाठी दरमहा १० हजार रुपये गुंतवले तर तुम्हाला १६ लाख २६ हजार ४७६ रुपये मिळतील.

READ ALSO THIS :

 

तुमचा रंग सावळा आहे का ? याचे आरोग्यदायी फायदे जाणून व्हाल थक्क !

 

मराठा आरक्षण रद्द होण्यामागे ‘हे’ दोन प्रमुख कायदेशीर मुद्दे; जाणून घ्या