Weather Alert : आगामी 3 दिवसात ‘या’ 6 राज्यांत जोरदार पावसाचा अलर्ट, अनेक भागात येऊ शकतो पूर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  जूनच्या सुरूवातीलाच मान्सूनचे केरळमध्ये आगमन झाले होते. आता मान्सून हळूहळू अन्य राज्यांकडे सरकू लागला आहे. यादरम्यान उत्तर आणि पुर्वोत्तर भारताच्या अनेक भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. ज्यामुळे गर्मीपासून दिलासा मिळणार आहे, सोबतच धान्याच्या पिकाला सुद्धा फायदा मिळेल. तर दुसरीकडे जोरदार पावसामुळे काही राज्यात पूर सुद्धा येऊ शकतो, ज्यामुळे प्रशासनाने अलर्ट जारी केला आहे.

बिहारसह 6 राज्यात अलर्ट

हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ आरके जेनामनी यांच्यानुसार पुढील तीन दिवसात आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, बिहार, सिक्किम आणि पश्चिम बंगालमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे. यादरम्यान या राज्यांच्या अनेक भागात पूर सुद्धा येऊ शकतो. ज्यामुळे अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अलर्टनंतर राज्य सरकारांनीसुद्धा तयारी सुरू केली आहे, जेणेकरून सुरक्षेच्या दृष्टीने पूर्वतयारी करता येईल. अनेक ठिकाणी पावसासह जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.

आसाममध्ये हजारो लोक प्रभावित

आसाममध्ये मागच्या एक आठवड्यापासून लागोपाठ जोरदार पाऊस सुरू आहे. ज्यामुळे 100 पेक्षा जास्त गावांमध्ये पाणी शिरले आहे. पुरामुळे राज्यात 38 हजारपेक्षा जास्त लोक प्रभावित झाले आहेत. तर मृतांचा आकडा 12 झाला आहे. डिब्रूगढमध्ये सीआरपीएफ हेडक्वार्टरमध्येसुद्धा पुराचे पाणी शिरले, ज्यामुळे जवानांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागानुसार ब्रह्मपुत्र नदी धोक्याची पातळीच्या अवघी एक मीटर खाली आहे. हे पाहता प्रशासन अलर्ट झाले आहे.

यूपीतही सक्रिय झाला मान्सून

भीषण गर्मीचा सामना करणार्‍या युपीवाल्यांसाठी चांगली बातमी आहे. पुढील दोन दिवसांत युपीत काही ठिकाणी सामान्य तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होणार आहे. हवामान विभागानुसार, दक्षिण-पश्चिम मान्सून उत्तर प्रदेशच्या बहुतांश भागात पोहोचला आहे. ज्यामुळे राजधानी लखनऊ आणि जवळपासच्या भागात पाऊस सुरू झाला आहे. कानपुर, फर्रुखाबाद, हरदोई, सीतापुर, बाराबंकी, गोंडा, बहराइच, श्रावस्ती, गोरखपुर, आजमगढ़, प्रतापगढ, संत रविदास नगर, वाराणसी, मिर्जापुरमध्ये सुद्धा जोरदार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.