अत्यंत महत्वाचे… ! तुमच्या ९ महिने ते १०वी पर्यंतच्या मुलांना ही लस द्यायला विसरू नका …!

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन –गोवर आणि रुबेला सारख्या रोगांपासून  मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी मिझल-रूबेला लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत आजपासून म्हणजेच २७ नोव्हेंबर २०१८ पासून तुमच्या ९ महिने ते १५ वर्षापर्यंतच्या मुलांना ही लस द्यायची आहे. दरम्यान संपूर्ण भारतातील प्रत्येक राज्यात, जिल्ह्यात, शहरातील आरोग्य केंद्रात ही लस देण्याचे  कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकारने नियोजीत केले आहे. मिझल-रूबेला लसीकरण मोहीम पुणे शहरातही प्रत्येक शाळेत अगंणवाडीत आणि आरोग्य केंद्रात, अगदी मोफत सुरु होत आहे.

ही लस आहे सुरक्षित

१)आतापर्यंत भारतात ९ कोटी ६० लाख बालकांना ही लस देण्यात आली आहे.

२)आतापर्यंत नऊ राज्यांमध्ये ही M/R ची मोहीम राबविली गेली आहे. यात कोणत्याच बाळाला काहीही झालेले नाही.
३)ही लस दहा डोसेसची असणार आहे.
४)ही मोहीम पाच आठवडे चालणार आहे.
५)तसेच ही लस AD सिरींजद्वारे दिली जाते. ही सिरींज एकदा वापरात आल्यावर आपोआप लाॅक होते, त्यामुळे या सिरींजचा वापर पुन्हा करता येत नाही.
६)या आधी गोवर/ एम आर / एमएमआर लस दिली असल्यास पुन्हा या मोहिमेत लसीकरण करणे आवश्यक.

कोठे मिळेल ही लस
आजपासून सहा आठवडे राज्यात सर्वत्र लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे.  ही लस “शासकीय व मनपा रूग्णालयात” उपलब्ध आहे. या मोहिमेअंतर्गत खासगी शाळांमध्ये पहील्या २-३ आठवडयात लसीकरण सत्रांचे नियोजन करण्यात येणार आहे. उर्वरित लाभार्थ्यांकरिता लसीकरणाचे नियोजन सत्रे लाभार्थी व जागेच्या उपलब्धतेनुसार अंगणवाडी केंद्र/बालवाडी/समाजमंदिर/खाजगी बालरोगतज्ञ यांच्याकडे ही लस दिली जाणार आहे.

गोवर(मिझल्स) :
हा अत्यंत संक्रामक आणि घातक आजार असून तो मुख्यत्वे लहान मुलांना होतो. ताप येणे, शरीरावर पुरळ येणे, सर्दी व खोकला असणे, डोळे लाल दिसणे ही लक्षणे गोवरमध्ये आढळतात. लहान मुलांच्या मृत्यूसाठी गोवर हा आजार एक प्रमुख कारण आहे. सन २०१६ च्या आकडेवारीनुसार गोवर आजारामुळे संपूर्ण जगात साधारणत: १,३४,२०० मुले मृत्यूमुखी पडतात यापैकी ४९,२००मुले (३७%) संपूर्ण भारतात दरवर्षी मृत्यूमुखी पडतात.

रुबेला:
(जर्मन मिझल्स) हा आजार त्या मानाने सौम्य संक्रामक आजार आहे जो मुलांना तसेच प्रौढ व्यक्तींना देखील होतो, या रोगाच्या रुग्णांमध्ये गोवराप्रमाणेच लक्षणे दिसतात. रुबेला हा आजार गर्भवती मातेला झाल्यास बाळाचा उपजत मृत्यू होऊ शकतो, जन्माला येणाऱ्या बाळास मोतिबिंदू, हृदयाचे आजार, मतिमंदता, बहिरेपणा, वाढ खुंटणे, यकृत व प्लिहा या अवयवांचे आजार होऊ शकतात. याला जन्मत: रुबेला सिंड्रोम (Congenital Rubella Syndrome- CRS) असे म्हणतात. असे बालक त्या महिलेच्या कुटूंबासाठीच नव्हे तर समाजासाठी दुसरे ओझे लादल्यासारखे आहे. भारतामध्ये दरवर्षी अंदाजे ४० ते ५० हजार जन्मत: रुबेला सिंड्रोमचे (Congenital Rubella Syndrome- CRS) रुग्ण आढळतात.

गर्भवती मातेला रुबेला झाल्यास तिच्या होणाऱ्या बाळास हा आजार होण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे त्या बाळास खालील बाबी होण्याची दाट शक्यता असू शकते.

१) बाळाचा मेंदू छोटा असू शकतो.
२)बाळ जन्मत:च अपंग असू शकते.
३)बाळाचे डोळे तिरपे तसेच डोळ्यात टिक असू शकते.
४)बाळाला M/R लस न दिल्यामुळे संपूर्ण भारतात ५० हजार बालके मृत्यू पावतात.
५)बाळास आंधळेपणासुद्धा येऊ शकतो.

दरम्यान , महाराष्ट्राला गोवर-रुबेला सारख्या घातक आजारांपासून मुक्त करण्यासाठी सामान्य नागरिकांनी लसीकरणामध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा आणि मोहिम यशस्वी करावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केले.

३ कोटी ३८ लक्ष बालकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ही लस सुरक्षित आहे. तसेच यापूर्वी ही लस घेतली असल्यास देखील या मोहिमेत लस टोचून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत. सध्या ही मोहीम २० राज्यांमध्ये राबविली जात आहे.